मुंबई : दिलीप कुमार दिलीप कुमार यांचं निधन झालं. यानंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “शौकत खनूम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरसाठी दिलीप कुमार पाकिस्तान आणि लंडनमध्ये कार्यक्रमासाठी आल्यामुळे बराच निधी गोळा झाला.” अशी आठवण खान यांनी सांगितली आहे. SKMTH हे हॉस्पीटल खान यांच्या आईंच्या स्मरणार्थ लाहोर आणि पेशावरमध्ये आहे. शाहिद आफ्रिदीनेही दुःख व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा https://t.co/3v2KqFjmRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानच्या पेशावरमध्ये किसा खवानी बाजार भागात 11 डिसेंबर 1922 साली झाला होता. दिलीप कुमार यांचं पेशावरमध्ये असलेलं वडिलोपार्जित घर तिथल्या पख्तुनख्वा सरकारने विकत घ्यायला मंजुरी दिली होती. दिलीप कुमार यांच्या या घराला संग्रहालय बनवण्याची तिथल्या सरकारची योजना आहे.
Apart from this, for my generation Dilip Kumar was the greatest and most versatile actor.
— Imran Khan (@ImranKhanPTI) July 7, 2021
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दिलीप कुमार यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे. SKMTH साठी निधी गोळा करायला ते पुढे आले हे मी कधीही विसरू शकत नाही.
निधीचे सुरुवातीचे 10 टक्के पैसे जमा करणं सगळ्यात कठीण होतं. दिलीप कुमार पाकिस्तान आणि लंडनमध्ये कार्यक्रमासाठी आल्यामुळे बराच निधी गोळा झाला,’ असं इम्रान खान म्हणाले. माझ्या पिढीसाठी दिलीप कुमार सर्वोत्तम आणि अष्टपैलू अभिनेते होते, असं ट्वीटही इम्रान खान यांनी केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानो, कुटुंबीय, मित्र आणि चाहते अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी जमले. तिरंगामध्ये लपेटून निवासस्थानाकडे जाण्यासाठी शेवटचा प्रवासाचा क्षण (सौजन्य – पिंकव्हिला) #surajyadigital #सुराज्यडिजिटल #DilipKumar #RIPhttps://t.co/jD1lk0i6nW
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
SKMTH म्हणजे शौकत खनूम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर हे पाकिस्तानच्या लाहोर आणि पेशावरमध्ये आहे. लाहोरमधलं SKMCH&RC शौकत खनूम मेमोरियल ट्रस्टचं पहिलं रुग्णालय आहे. इम्रान खान यांची आई शौकत खनूम यांचं 1985 साली कॅन्सरने निधन झालं. यानंतर इम्रान खान यांनी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी निधी गोळा करायला दिलीप कुमार यांनी पुढाकार घेतला.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1412627136821800960?s=19
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही दिलीप कुमार यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. ‘आपण सगळे अल्लाहचे आहोत, त्यामुळे आपल्याला परत तिकडे जावं लागतं. खैबर पख्तुनख्वापासून मुंबईपर्यंत आणि संपूर्ण जगभरात युसूफ खान साहेबांच्या चाहत्यांचं हे खूप मोठं नुकसान आहे. ते आमच्या मनात राहतील. सायरा बानो यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,’ असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.
अभिनेता दिलीप कुमारांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय व्यक्तींसह सेलेब्रेटींची गर्दी https://t.co/ZkzmVy7sU7
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021