मुंबई : काँग्रेसचे मुंबईचे माजी शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. ज्यावेळी 370 कलमचा विषय आला तेव्हा त्यांना वाटले की भारताला एक संघ बनवण्यासाठी मोदी हे प्रयत्न करत असेल तर मदत केली पाहिजे. काँग्रेस सोडून ते मधल्या काळात 370 कलम बद्दल जनजागृती करत होते, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटल.
Maharashtra: Former Congress Minister Kripashankar Singh joins Bhartiya Janata Party in Mumbai
BJP leaders Devendra Fadnavis & Chandrakant Patil were also present. pic.twitter.com/dQvuNKWAXt
— ANI (@ANI) July 7, 2021
काँग्रेसचे मुंबईचे माजी शहरअध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपा शंकर सिंग यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. ‘370 कलमाच्या जनजागृतीसाठी काम केले म्हणून त्यांना प्रवेश दिला’ असंही फडणवीस यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध केला होता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
माजी मंत्री श्री. कृपाशंकर सिंह आणि नाशिक जिल्हा परिषद सदस्य श्री. यतीन कदम यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा परिवारातर्फे या सर्वांचे हार्दिक स्वागत. यावेळी विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/D4EMIbzltL
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) July 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी यतीन कदम यांनीही प्रवेश केला. ‘आपल्यासाठी आनंदाची बाब की ताकद असलेले लोक प्रवेश करतात.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलं दिलीप कुमारांचं अंत्यदर्शन #surajyadigital #DilipKumar #सुराज्यडिजिटल #दिलीपकुमार #Dilipkumarsahab pic.twitter.com/t9vQkII697
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
मी त्यावेळी म्हणालो होतो की मोठी संधी आहे. जिथे लोक भाजपच्या विरोधात एकवटले तिथे भाजप वाढतो. त्यामुळे 1-2 टर्म सत्ता नसेल तर आम्ही विचार करत बसत नाही.
ज्यावेळी 370 कलमाचा विषय आला त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागं झालं तेंव्हा त्यांना वाटले की भारताला एक संघ बनवण्यासाठी मोदी हे प्रयत्न करत असेल तर मदत केली पाहिजे. त्यांनी 21 महिने झाले काँग्रेस सोडून ते मधल्या काळात 370 कलम बद्दल जनगागृती करत होते, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
वाहतूक पोलिसाने मागितले पैसे, मग त्याने काढले रस्त्यावरच कपडे https://t.co/Zh3qKcw8P3
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
तर, ‘देवेंद्र फडणवीस यांनी मला कधी अडचणीत आणले नाही. मंत्री असताना ते प्रश्न विचारायचे. मी सांगायचो की नंतर उत्तर देतो ते मान्य करायचे. मी ठरवले की जर मला राजकारण करायचे असेल तर ते भाजपमध्येच करेन. तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास दाखवा मी तो पूर्ण करेन, असं यावेळी कृपाशंकर सिंग म्हणाले.