नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु आहे. ‘मै नारायण तातू राणे, ईश्वर की शपथ लेता हूँ…’ असं म्हणत राणेंनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी सर्वात आधी राणेंना शपथ दिली. त्यामुळे राणेंना मोठं मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. राणेंसोबतच आतापर्यंत ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनोवाल, किरेन रिजीजू, हरदिपसिंग पुरी, मनसुख मंडाविया, अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
#CabinetExpansion2021 | Pashupati Kumar Paras, Kiren Rijiju and Raj Kumar Singh take oath as ministers. pic.twitter.com/XzpZ1ejxdx
— ANI (@ANI) July 7, 2021
‘मै नारायण तातू राणे … ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नारायण राणेंनी घेतली हिंदीतून सर्वात आधी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ#ModiCabinet #CabinetReshuffle #NarayanRane #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/HsEJRT6u68
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही अकार्यक्षम नेत्यांकडून मंत्रिपद काढून घेतलं आहे. तर काहींना नवीन जबाबदारी दिली आहे. तर काही नवख्या नेत्यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी दिली जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार आहे. आज बुधवारी संध्याकाळी जवळपास 43 मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे.
#UPDATE | 43 leaders will take oath as Union Ministers in the Union Cabinet expansion, to be held later today
— ANI (@ANI) July 7, 2021
मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे.
अभिनेता दिलीप कुमारांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय व्यक्तींसह सेलेब्रेटींची गर्दी https://t.co/ZkzmVy7sU7
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021