मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल आणि वैवाहिक आयुष्याबद्दल बोलली. ती म्हणाली, बॉलिवूडमधल्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न केलं नाही हे चांगलंच झालं. मी खूप नशीबवान आहे की मी एका अशा व्यक्तीला भेटले ज्याचे विचार माझ्यासारखे आणि स्त्रीवादी आहेत. देवाचे आभार की मी बॉलिवूडशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीशी लग्न केलं नाही. असं झालं असतं तर मग माझं जग खूपच सिमित राहिलं होतं.
'बँक ऑफ इंडिया'मध्ये खाते असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी करा 'हे' काम #BANKOFINDIA #bank #working #surajyadigital #सुराज्यडिजिटल #30Sep pic.twitter.com/VAnZSSe9yI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
‘वोग’ या फॅशन मॅगझिनशी बोलताना सोनम म्हणाली, “मला इथलं स्वातंत्र्य पसंत आहे. मी माझी सगळी कामं स्वतःच करते. पोळ्या बनवते. रूम ची साफसफाई करते, याशिवाय घरातील सामानाची खरेदी देखील मी स्वतःच करते.”
याशिवाय पती आनंद आहुजा सोबत कसा वेळ घालवतो यावरही सोनम म्हणाली, “आम्ही काम संपल्यावर एकमेकांशी खूप गप्पा मारतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा https://t.co/3v2KqFjmRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
रात्री जेव्हा टीव्ही वरील कार्यक्रम पाहण्याची वेळ येते तेव्हा आमचं अजिबात पटत नाही. आनंद ला फुटबॉल मॅच पहायची असते तर मला ‘क्वीन्स ऑफ गॅम्बित’ पहायचं असतं.”
सोनम लंडन मध्ये राहत असली तरीही कामानिमित्त आणि आपल्या कुटुंबियांना भेटायला ती भारतात येत असते. अनेकदा ती एअरपोर्ट वर स्पॉट होते. याविषयी बोलताना पुढे ती म्हणाली, “मला भारताची फार आठवण येते. मी माझ्या कुटुंबियांना, मित्रमैत्रीणींना खूप मिस करते. मला आनंद आहे की मी माझ्या घरात आहे माझ्यासोबत आनंद आहे.”
ऐ भाई कोई है…
ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे निधन, त्यांच्या एक गाजलेला सीनद्वारे टाईम मीडिया हाऊसच्या सुराज्य डिजिटल परिवारातर्फे अभिवादन (सौजन्य – यशराज फिल्म्स्) #surajyadigital #सुराज्यडिजिटल
#RIP #DilipKumarRIPhttps://t.co/76pO19ceBb— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
सोनम आणि आनंदने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 साली विवाह केला होता. तिने असंही म्हटलं होतं की, “आम्ही एकमेकांसोबत इतक्या मजबूत नात्यात होतो की आम्हाला फरक नाही पडत याला कोणतं नाव दिलं पाहिजे. पण कुटुंबियांसाठी आम्ही विवाह केला.”