सोलापूर : सात रस्ता परिसरातील मराठी पत्रकार भवनजवळून महावीर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अंगावरील कपडे काढून हंगामा केल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने पैसे मागितल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा होती.
केंद्राच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान https://t.co/wqqlmbWiWP
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
हा व्हिडिओ व्हायरल झाला. थेट पोलीस अधिका-यांपर्यंत पोहचला. त्याअनुषंगाने त्या ठिकाणी ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली. शहरातील गॅस गोडावूनमधून एक दुचाकीस्वार घरगुती गॅस सिलिंडरची टाकी घेऊन जात होता. मराठी पत्रकार भवन परिसरातून महावीर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून तो निघाला.
ओबीसी आरक्षण प्रश्नावर माढ्यात सकल ओबीसी समाजाचे चक्काजाम आंदोलन
https://t.co/QZdok9TGlB— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा https://t.co/3v2KqFjmRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
त्या वेळी चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने त्याला हटकत दुचाकी थांबवली व मास्क नसल्याचे कारण सांगून पैशांची मागणी केली. तेव्हा त्या दुचाकीस्वाराने “मास्क घालेन नाहीतर कपडे काढून फिरेन, तुम्हाला काय करायचे’ असे उत्तर दिले. त्या वेळी “कपडे काढा नाहीतर काही करा, दंड भरा’ अशी भूमिका तेथील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने घेतली. त्या वेळी त्या दुचाकीस्वाराने अंगावरील कपडे काढून हंगामा केला. त्या ठिकाणी उपस्थित एकाने व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
ऐ भाई कोई है…
ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे निधन, त्यांच्या एक गाजलेला सीनद्वारे टाईम मीडिया हाऊसच्या सुराज्य डिजिटल परिवारातर्फे अभिवादन (सौजन्य – यशराज फिल्म्स्) #surajyadigital #सुराज्यडिजिटल
#RIP #DilipKumarRIPhttps://t.co/76pO19ceBb— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
तो व्हिडिओ पोलिस उपायुक्त डॉ. धाटे यांच्यापर्यंत पोचला. त्याअनुंषगाने त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान, दुचाकीवरून गॅस सिलिंडर टाकी घेऊन जाताना त्या व्यक्तीने मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे त्याला वाहतूक पोलिसाने आवाज देत दंडाची मागणी केली. त्या वेळी दुचाकीस्वाराने दुचाकी थांबविली आणि उद्धट बोलू लागला. त्याला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने उलट उत्तर दिल्यानंतर त्या व्यक्तीने तसा गोंधळ घातला,अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत आली आहे. दरम्यान,तो दुचाकीस्वार मनोरुग्ण असल्याचेही पोलिसांना कोणीतरी सांगितल्याचे वृत्त आहे.