मुंबई : ज्येष्ठ अभिनेते भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर समजले जाणारे दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. आज बुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. जलील पारकार यांनी सांगितलं.
Veteran actor Dilip Kumar passes away at the age of 98, says Dr Jalil Parkar, the pulmonologist treating the actor at Mumbai's PD Hinduja Hospital
(File pic) pic.twitter.com/JnmvQk8QIk
— ANI (@ANI) July 7, 2021
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्वीटवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
Dilip Kumar Ji will be remembered as a cinematic legend. He was blessed with unparalleled brilliance, due to which audiences across generations were enthralled. His passing away is a loss to our cultural world. Condolences to his family, friends and innumerable admirers. RIP.
— Narendra Modi (@narendramodi) July 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
End of an era… Om Shanti 🙏 pic.twitter.com/CrJJvtkMCP
— Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) July 7, 2021
आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.
Grew up watching his movies and this is my favourite picture! #DilipKumar #SairaBanu with my mother and aunt! #RestInPower Dilip Saheb! #EndOfAnEra 🤍 💛 pic.twitter.com/MkAreDgBTT
— Hima (हिमा) (@himabista) July 7, 2021
#ripdilipkumar Great memories #DilipKumar with #karunanithi and #MGR pic.twitter.com/tlW0DWLKaf
— Ravi Selvarajan (@Ravi_Selvarajan) July 7, 2021
* ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळख
दिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे.
https://twitter.com/TheDilipKumar/status/1408363264627544068?s=19
* दिलीपकुमारांना मिळाले अनेक पुरस्कार
– गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद आहे.
1980 ते मुंबईचे शेरीफ होते. 1991 ला त्यांना पद्मभूषण मिळाला.
– 2015 ला पद्मविभूषणने गौरव झाला. 1994 साली दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
– पाकिस्तानने निशाण-ए-इम्तियाज या पुरस्काराने गौरव केला. तो स्विकारण्याला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला. होता. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण केले.
Shri Dilip Kumar Ji was a veritable legend of the silver screen, in him, Indian Cinema has lost one of the greatest actors. He has entertained generations of cinema lovers with his incredible acting and iconic roles. My sincerest condolences to Dilip Ji’s family and followers.
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) July 7, 2021