अक्कलकोट : नवरा बायकोमध्ये झालेल्या भांडणातून होटगी ( ता.दक्षिण सोलापूर) येथे एका विवाहित महिलेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास दोघींचाही मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. वळसंग पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. यामुळे होटगी गावावर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा https://t.co/3v2KqFjmRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
राचम्मा संतोष पटणे (वय २६) व मुलगी चैत्रा पटणे (वय ६, दोघी रा. पटणे गल्ली, होटगी ता. दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या दोघींची नावे आहेत. राचम्मा व तिचा पती संतोष पटणे यांच्यामध्ये भांडण झाले होते. यामुळे ती सकाळी रागाच्या भरात आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेली होती. नातेवाइकांनी दिवसभर तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नारायण राणेंसह या मंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ, 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथhttps://t.co/2qmYFLKgW2
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
बुधवारी फताटेवाडीजवळील अशोक चव्हाण यांच्या शेतातील (गट नंबर २४७) मधील विहिरीत दोघींचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. याची माहिती मिळताच असून पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पीएसआय पाटील व इतर सहकारी घटनास्थळी आले.
स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली आहे.
वाहतूक पोलिसाने मागितले पैसे, मग त्याने काढले रस्त्यावरच कपडे https://t.co/Zh3qKcw8P3
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021