नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना आता सायटोमगलो व्हायरस (Cytomegalo virus) हा विषाणू समोर आला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत या विषाणूची बाधा झालेले 6 कोविड- 19 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, हा विषाणू सामान्य हर्पीज व्हायरस आहे. हा विषाणू शरीरात सुप्तावस्थेत म्हणजे अदृश्य अवस्थेत असतो.
मुंबईकरांसाठी वाईट बातमी, आर्थिक राजधानीत आज लसीकरण बंद https://t.co/u22rvbpYZf
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
गरोदर महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना या सायटोमेगलो व्हायरसची बाधा झाली तर गंभीर परिस्थितींना सामोरे जावावे लागेल. हा विषाणू अशांना लगेच बाधतो. कोरोना महामारीतून देश बाहेर पडत आहे. दुसरी लाट जात असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता आता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यातच आता सायटोमगलो व्हायरस या विषाणूचं संक्रमण होऊन लोक आजारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत या विषाणूची बाधा झालेले 6 कोविड-19 रुग्ण सापडले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सायटोमगलो व्हायरस विषाणू सामान्य हर्पीज व्हायरस आहे. या विषाणूची बाधा झाल्यावर लक्षणं दिसत नाहीत. हे विषाणू सुप्तावस्थेत असतात. सध्या तरी बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र वेळीच सावधानता बाळगली नाही तर, धोका वाढू शकतो.
भीमा कोरेगाव : दोषारोपपत्रात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंचं नाव नाही, शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार https://t.co/CRgfdQio2T
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
* हा विषाणू कसा पसरतो ?
मानवी शरीरातील द्रव रक्त, लाळ, मूत्र किंवा अश्रूंच्या माध्यमातून म्हणजे त्याच्या संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. गरोदर मातेकडून याची लागण बाळाला होऊ शकते आणि नंतर याची लक्षणं बाळाच्या आरोग्यात झालेल्या बदलांतून निदर्शनास येऊ लागतात. सायटोमगलो हा विषाणू 40 वर्षांपूर्वी सापडलेला आहे पण आता कोविड-19 च्या (Covid-19) रुग्णांमध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा रुग्णांना विषाणू लगेच जडत आहे.
* या विषाणूचे लक्षणं कोणते ?
ताप येणं, घाम येणं, थकल्यासारखं वाटणं, अस्वस्थता, घसा खवखवणं, सांधेदुखी आणि स्नायूदुखी अशी लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर भूक कमी होते. वजनही कमी होतं, पण ही लक्षणं 2 आठवड्यांत कमी होऊन रुग्ण बरा होतो. फुफ्फुसं, डोळे, पचनक्रिया यांच्यावर प्रामुख्याने हा विषाणू हल्ला करतो. ताप येणं, जुलाब, पोटाचा अल्सर, रक्त वाहणं, दम लागणं, न्यूमोनिया, तोंड येणं, दृष्टी क्षीण होणं, मेंदूला सूज येणं अशी लक्षण रुग्णामध्ये दिसून येतात.
Further strengthening India's fight against #COVID19!
This #CabinetDecision will accelerate health system preparedness for an immediate response to early prevention, detection & management, with a special focus on health infrastructure development. pic.twitter.com/aKLzFbZQkH
— MyGovIndia (@mygovindia) July 8, 2021