मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर काल गुरुवारी ( ८ जुलै) तातडीने बायपास सर्जरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अकोला शहराजवळ भीषण अपघात; चौघे ठार https://t.co/t0W5vNZU1C
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात मेडिकल बुलेटिन जाहीर केले आहे. प्रकाश आंबेडकर हे सध्या आयसीयूमध्ये असून अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले आहे. वैयक्तिक कारणांमुळे पुढील तीन महिने पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली होती. यामुळे आगामी पाच जिल्ह्यातील निवडणुका लक्षात घेता पक्षाचे आंदोलन आणि निवडणूक कार्यक्रम सुरळीत सुरु राहावा यासाठी रेखा ठाकूर यांच्याकडे वंचितच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मेडिकल बुलेटिन –
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. pic.twitter.com/lNGvyVZF3R
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 9, 2021
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी आज प्रकाश आंबेडकरांचे मेडिकल बुलेटिन जाहीर त्यांच्या बायपास सर्जरीची माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी कळवलं आहे. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
वंचित बहुजन आघाडी के फेसबुक पेज पर रोजाना उनकी स्थिति के बारे में जानकारी दी जाएगी।
– रेखाताई ठाकुर
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 9, 2021
राजकारणपासून तीन महिने दूर राहण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला होता., “मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात तीन महिन्यांसाठी कार्यरत राहणार नाही. माझ्या व्यक्तीगत कारणामुळे कार्यरत राहणार नाही. पण पक्ष, संघटन चाललं पाहिजे. आंदोलन सुरु केलीयत. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहे. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणं आवश्यक आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची निवड करत आहे तर अरुण सावंत आणि जिल्हा कमिटी त्यांना सहकार्य करतील” असे प्रकाश आंबडेकर म्हणाले.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची व्हिडिओद्वारे अतिशय महत्वपूर्ण घोषणा! वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती!
फारुक अहमद
प्रदेश प्रवक्ता – वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र@Prksh_Ambedkar pic.twitter.com/vFxEDgOx1w— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 8, 2021
* प्रकाश आंबेडकरांची घोषणा…
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत कारणांसाठी पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कार्यकाळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तीन महिने राजकारणापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली. मात्र आंबेडकरांच्या अचानक सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावरून राजकीय तर्क लढवले जात होते. मात्र आज अधिकृत माहिती समोर आली आहे.
Yo!. Certainly liked reading your post. It was very informative and helpful. I hope you do not mind me blogging concerning this post on my personal blog. Will definitely link back to you. Nice site theme! Salamat.
You should take part in a tournament for starters of the finest blogs on the internet. I’ll recommend this blog!
240187 43104Pretty section of content material. I just stumbled upon your web site and in accession capital to assert that I get in fact enjoyed account your blog posts. Any way Ill be subscribing to your feeds and even I achievement you access consistently quickly. 503567