सोलापूर : सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या रूग्ण डॉक्टर नसल्यामुळे तिष्ठत उभा राहिला. परिणामी चक्कर येऊन खाली पडल्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सदरची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी उपायुक्तांकडे केली. उपायुक्तांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा ऑनड्युटी डॉक्टर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत उपायुक्त धनराज पांडे यांनी सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर चिडगुपकर यांना नोटीस बजावली आहे.
तुमच्या मोदींनी लस पुरवठा केला नाही, मी काय खिशातून देऊ?, पालिका आयुक्तांचा लोकप्रतिनिधींना उर्मट सवाल https://t.co/aes0HrWbWu
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
डफरीन हॉस्पिटलमधील या सावळ्या गोंधळामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. लाखो रुपये पगार घेऊन इथं काम करणाऱ्या डॉक्टरांनीची मनमानी कारभार या हॉस्पिटलमध्ये चालू आहे. ‘काम’ कमी आणि ‘दाम’ जास्त असा काहीसा प्रकार या हॉस्पिटलमध्ये आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरात 12 जुलैनंतर लहान मुलांना मोफत निमोनिया प्रतिबंधक लस
https://t.co/afeCK4jRWu— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
सोनोग्राफी असो, डोळे तपासणी असो आता इतर तपासण्या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती असताना दिवसभरामध्ये समाधानकारक काम केलं जात नाही. काम कमी आणि गैरहजर राहणे, खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस असे, रुग्णांच्या रांगा असताना मोबाईलवर बोलत वेळ घालवणे, असे प्रकार या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनात प्राप्त झाल्या आहेत.
पंकजा मुंडे भावूक, नाराज नसल्याचे स्पष्टीकरण; भागवत कराडांचा आला होता फोन
https://t.co/IVhdFvbanM— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
असाच काहीसा प्रकार काल गुरुवारी सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर चिडगुपकर यांच्या बाबतीत घडला. हॉस्पिटलमध्ये ऑनड्युटी असताना रुग्णांची संख्या मोठी असताना हे डॉक्टर महाशय गैरहजर राहिले. त्यामुळे अनेक रुग्णांना तिष्ठत उभा रहावे लागले. त्यामुळे एका रुग्णाला चक्कर येऊन खाली पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच धावपळ उडाली. त्यानंतर ही घटना पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना समजली, त्यांनी तात्काळ हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट दिली. सोनोग्राफी तज्ञ डॉक्टरचे चिडगुपकर गैरहजर होते, त्या सोनोग्राफीसाठी अनेक रुग्ण रांगेत तिष्ठत उभे होते. त्या सर्व घटनेची माहिती घेऊन त्यांनी डॉक्टर चिडगुपकर यांना नोटीस बजावली आहे.
“डफरीन हॉस्पिटलमध्ये काही गोष्टींची कमतरता असल्याची तसेच रुग्णाच्या चक्कर येवुन पडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली, त्या वेळेस सोनोग्राफी तज्ञ गैरहजर असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांना नोटीस बजावून खुलासा मागितलाय”
धनराज पांडे – उपायुक्त, महापालिका