सोलापूर : एका गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला मदत करतो म्हणून तब्बल साडेसात लाखांची लाच मागणाऱ्या सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना काल शुक्रवारी (ता.९) सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मोहोळ : समाजकल्याणच्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोठा आर्थिक घोटाळा https://t.co/m6D5fHHJIC
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
शेतातून विनापरवाना मुरूम उचलल्याप्रकरणी एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरुन सलगर वस्ती पोलिस ठाणे अंतर्गत अवैध मुरूम उपसा प्रकरणात गुन्हा दाखल होता. संबंधित आरोपीला या गुन्ह्यात मदत करतो म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी साडेसात लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एवढ्या मोठ्या लाचेची मागणी केल्याने घाबरला. रक्कम मोठी असल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काल शुक्रवारी (ता. ९) रात्री साडेसातच्या सुमारास जुना पुना नाका याठिकाणी लाच घेताना अँटी करप्शन विभागाने धाड टाकली. दोन पोलिस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
डफरीन हॉस्पिटलमध्ये ऑनड्युटी डॉक्टर बाहेर, उपायुक्तांनी बजावली नोटीस https://t.co/WCOU6m1CJf
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुना पुना नाका येथे एपीआय खंडागळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे एपीआय रोहन खंडागळे याची कारवाई दिवशी म्हणजे शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी होती, अशीही माहिती समोर येत आहे. तक्रारदाराकडून खंडागळे याने एकाचवेळी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेतली. या वेळी त्याला लाचलुचपत विभागाने पकडल्याची माहितीही या विभागाने रंगेहाथ पकडले.
सोलापुरात 12 जुलैनंतर लहान मुलांना मोफत निमोनिया प्रतिबंधक लस
https://t.co/afeCK4jRWu— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
या गुन्ह्यामध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत का, याचा तपास त्याच्या कॉल रेकॉर्डिंगवरून लाचलुचपत विभागाचे अधिकारी घेत आहेत. त्याचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली.
अकोला शहराजवळ भीषण अपघात; चौघे ठार https://t.co/t0W5vNZU1C
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021