मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर, अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या. आता या निवडणुकाच स्थगित झाल्याने तणाव काहीसा निवळण्याची शक्यता आहे.
"काका-पुतण्याच्या" ताटाखालचे मांजर कोण, आम्ही? ओबीसी काँग्रेस नेते भडकले
https://t.co/3JwFMilEtn— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता आयोगाने १९ जुलै रोजी होणाऱ्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या.
कोविडचे कारण पुढे करून महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट – गणांच्या पोटनिवडणुका आज अखेर पुढे ढकलल्या गेल्यात. राज्य निवडणूक आयोगाने कोविडचे कारण पुढे करून पोटनिवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने ओबीसी राजकीय आरक्षण टिकविण्यात अपयश आल्यानंतर निवडणुकीच्या कटकटीतून राजकीय पळवाट काढली, असल्याचे बोलले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजप, संघाचा डाव, परत दिला स्वबळाचा नारा #congress #surajyadigital #OBC #सुराज्यडिजिटल #ओबीसी #काँग्रेस
– सोलापूर काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी दौ-यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना https://t.co/Hi2NfENaxR— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
राज्य सराकारने कोविडचे कारण दाखवून निवडणूक आयोगाला पोटनिवडणूका पुढे ढकलण्याची विनंती केली होतीच. त्यानुसार आयोगाने त्या पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. या बाबत राज्याचे निवडणूक आयुक्त यू. ए. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते. परंतु, आता पोटनिवडणूका रद्द केल्याने हे मतदान होणार नाही.
रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत, साडेसात लाखांची लाच https://t.co/g9sOHGOkvZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
मूळात ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला सुप्रिम कोर्टात अपयश आले होते. त्यामुळे आधी जाहीर केलेल्या या पोटनिवडणुकांना भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्यात यावा. त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, यासाठी भाजपने आग्रह धरला होता.
त्याचवेळी पराभव झाला तरी चालेल पण भाजप या पोटनिवडणूकांमध्ये ओबीसी उमेदवारच देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
मोहोळ : समाजकल्याणच्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोठा आर्थिक घोटाळा https://t.co/m6D5fHHJIC
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021