सोलापूर : होटगी येथील बिर्ला सिमेंट फॅक्टरी कंपनी जवळ एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. ९) दुपारच्या सुमारास घडली.मयत तरुण एका सिमेंट कंपनीमध्ये कामास असल्याचे वृत्त आहे. तर पुणे सोलापूर महामार्गावर दोन ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झालाय. यात दोघे ठार तर एकजण गंभीर जखमी झालाय.
"काका-पुतण्याच्या" ताटाखालचे मांजर कोण, आम्ही? ओबीसी काँग्रेस नेते भडकले
https://t.co/3JwFMilEtn— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
श्रीपती गंगाधर काटगावकर (वय ३२, रा. पटने नगर, होटगी स्टेशनजवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाची खिशातील आधारकार्डावरुन ओळख पटण्यास मदत झाली. दोन दिवसापूर्वी शुक्रवारी दुपारी उद्यान एक्स्प्रेसच्या चालकाने एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती कळवली. घटना कळताच लोहमार्ग पोलीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जागतिक लोकसंख्या दिन : दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, हे असतील बंधने https://t.co/G2vmKLFMtB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
तिथे गेल्यानंतर मृत तरुणाची पोलिसांनी ओळख पटविली. दरम्यान, त्याच्या खिशामध्ये आधारकार्ड आढळले. त्यावरून पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. दरम्यान, तो तरुण एका सिमेंट कंपनीमध्ये कामास असल्याचे लक्षात आले. तो तरुण विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.
* पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार
पुणे – सोलापूर महामार्गावर पहाटे दोन ट्रक व कंटेनर या तीन अवजड वाहनांच्या विचित्र अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर व क्लीनर मृत्यूमुखी पडले असून कंटेनर मधील एकजण गंभीर जखमी झाला आहे.
जागतिक लोकसंख्या दिन : वाढत्या लोकसंख्येचे आव्हान.! (ब्लॉग) https://t.co/UzBuMuDsgS
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर अनिल अंकुश व क्लिनर शकील इस्माईल शेख (वय- ३२, रा. बसवकल्याण,जि. बिदर, राज्य- कर्नाटक ), व अनिल अंकुश सूर्यवंशी (वय- ३५ , रा.केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर ) या दोघांचा मृत्यू झाला आहे. कंटेनरमधील आण्णासाहेब गणपत गायकवाड (वय- ४४, रा. मुंढवा, पुणे) हे गंभीर जखमी झालेत. त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोर झाला आहे.
ना लसीकरण, ना कोरोना अहवाल
– लसीकरण आणि कोरोना अहवाल मिळत नसल्याने काम मिळत नसल्याने विडी महिला कामगार संतप्त, केला रास्ता रोको, काय म्हणतात ऐका…#surajyadigital #solapur #सोलापूर #रास्तारोको #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/MBYBVIpcTO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
अपघातातील कंटेनर हा पुणे सोलापूर – महामार्गावरून उलट दिशेने येवून धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोरून सोलापूर – पुणे महामार्गाकडे वळत होता. त्याचवेळी पुणे बाजूकडून सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेला ट्रक त्याला धडकला. यामुळे ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. तर कंटेनरच्या केबिनची मागील बाजूला चेंबून आत गेली. याचवेळी आंध्र प्रदेश वरून पुणे बाजूकडे फरशी घेऊन निघालेला ट्रक कंटेनरला अडकला.
आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजप, संघाचा डाव, परत दिला स्वबळाचा नारा #congress #surajyadigital #OBC #सुराज्यडिजिटल #ओबीसी #काँग्रेस
– सोलापूर काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी दौ-यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना https://t.co/Hi2NfENaxR— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
तिन्ही अवजड वाहने एकमेकांना धडकलेने मोठा आवाज झाला. या आवाजाने जवळचे नागरिक जागे झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यास सदर माहिती कळवली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच ट्रक ड्रायव्हर व क्लीनरचा मृत्यू झाला होता.