बार्शी : एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाचे निर्माते व अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना टोंगा या आशिया खंडातील देशातील माकुंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल करुन सन्मानित करण्यात आले.
सोलापुरातील 83 शाळांची घंटा वाजली, मात्र माळशिरस तालुक्यात घंटा नाही वाजली https://t.co/gXL6NQjU9f
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
दिल्ली येथील उद्योग विहार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कुलगुरु डॉ. रिपू रंजन सिंन्हा यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक सदस्य प्रोफेसर राकेश मित्तल, डॉ. प्रियदर्शनी नायर, केंद्रीय मंत्रालय प्रतिनिधी सैफी अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते. या पदवीमुळे डॉ. कसपटे यांच्या सीताफळ संशोधन कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे.
देश आणि परदेशातही एनएमके-1 गोल्डन या त्यांनी निर्मिलेल्या वाणाला मिळणार्या सर्वाधिक पसंतीचे हे द्योतक आहे. या सन्मानामुळे डॉ. कसपटे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आमदार सुभाष देशमुखांना अल्पशिक्षितांसाठी काही तर करायचंय, मागितल्या विचार आणि सूचना https://t.co/d84QMucXhp
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. नवनाथ कसपटे हे गेल्या 45 वर्षापासून सीताफळ शेतीमध्ये काम करत असून, त्यांनी विकसित केलेल्या आणि जगप्रसिद्ध असलेल्या एनएमके 1 गोल्डन या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वये स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे.
या क्रमांकाची नोट तुम्हाला बनवेल लखपती https://t.co/8SNZTyHxzG
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
शिवाय डॉ. कसपटे यांनी त्यांच्या मधुबन फार्मवर हस्तपरागीकरणाचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यातून निर्माण झालेल्या नवीन 2500 वाणाची लागवड केली आहे. हे वाण सध्या प्रयोगावस्थेत आहेत. एनएमके 1 गोल्डन या वाणाने अनेक सर्वसामान्य शेतकर्यांना करोडपती केले असून संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूनही या वाणाला वाढती मागणी आहे. देशात होत असलेल्या सिताफळ लागवडीमध्ये तब्बल 80 टक्के वाटा हा एनएमके-1 गोल्डन या वाणाचा आहे. असा हा महत्त्वपूर्ण वाण विकसित केल्याबद्दल डॉ. नवनाथ कसपटे यांना ही डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रास पुण्यात केली अटक https://t.co/IDy7oDZoSV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
डॉ. कसपटे यांना मिळालेली ही दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानित केले होते. टोंगा येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री. कौसा यांनी केलेल्या सुचनेवरून डॉ. कसपटे यांना ही डॉक्टरेट बहाल करण्यात आले असून, विशेष म्हणजे त्यांना या सन्मानाबरोबरच टोंगा देशात विशेषाधिकार देण्यात आले आहेत.
देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू https://t.co/4zVWQkOpqV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021