सोलापूर : शहरातून तडीपार असताना राष्ट्रवादी पक्षाचा नगरसेवक पुत्र विकी लक्ष्मण जाधव आणि त्याचा साथीदार संदीप राम गायकवाड याने एका नागरिकाच्या दुचाकीस धडक देऊन मारहाण केली. त्यानंतर तो पुन्हा फरार झाला होता. या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी पुणे येथे अटक केली आहे.
पोलीस त्या दोघांच्या शोधात होते. नंतर विजापूर नाका पोलिसांनी त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. विकी जाधव (रा. सेेटलमेंट, सोलापूर) असं नगरसेवक पुत्राचे नाव आहे. तर संदीप राम गायकवाड (रा. सेटलमेंट, सोलापूर) असं विकीच्या मित्राचे नाव आहे. विकी आणि त्याचा साथीदार संदीप गायकवाड या दोघांना पुण्यातून ताब्यात घेऊन सोलापूर येथे आणले आहे.
आमदार सुभाष देशमुखांना अल्पशिक्षितांसाठी काही तर करायचंय, मागितल्या विचार आणि सूचना https://t.co/d84QMucXhp
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
तर, विकी याच्यावर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये खंडणी, मारहाण करणे, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण, लुटमार करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक प्रकारची गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरातील 83 शाळांची घंटा वाजली, मात्र माळशिरस तालुक्यात घंटा नाही वाजली https://t.co/gXL6NQjU9f
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
विकी लक्ष्मण जाधव (रा. सेेटलमेंट, सोलापूर) याला सोलापूर शहर पोलिसांनी आयुक्तालयाने शहरातून तडीपार केले होते. तडीपारचा आदेश असताना देखील त्याने 16 मार्च 2021 रोजी एका नागरिकाच्या दुचाकीस धडक दिली होती. धडक देऊन तू मला ओळखत नाही का, मी कोण आहे, असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी करीत हातामध्ये दगड घेऊन मारहाण केली होती.
पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष ; आजपासून शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी, मुख्यमंत्री तरी लोक भावना जाणून घेतील का ? https://t.co/47NIX7HJyl
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
मारहाणीमध्ये जखमी झाल्यानंतर त्याने याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला होता. मारहाण करून विकी हा त्याच्या साथीदारासह फरार झाला होता. मारहाण करून विकी हा त्याच्या साथीदारासह पसार झाला होता. या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीने याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
ना लसीकरण, ना कोरोना अहवाल
– लसीकरण आणि कोरोना अहवाल मिळत नसल्याने काम मिळत नसल्याने विडी महिला कामगार संतप्त, केला रास्ता रोको, काय म्हणतात ऐका…#surajyadigital #solapur #सोलापूर #रास्तारोको #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/MBYBVIpcTO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021