मोहोळ : शेतामध्ये गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी आज सोमवारी अनगर गावच्या शिवारात धाड टाकत ६६ किलो गांजा जप्त करीत गांजाची ६५ झाडे हस्तगत केली आहेत. सदर गांजांची किंमत ६ लाख ८५ हजार ५०० रुपये आहे. ही कारवाई काल सोमवारी, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केली.
बार्शीचे डॉ. कसपटे कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या डॉक्टरेटने सन्मानित,सीताफळ संशोधनाची जागतिक स्तरावर दखलhttps://t.co/xk9j00kH2n
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
यात रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचनामा करण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे, पो. नि अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे व सरकारी पंच उपस्थित होते .
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ पोलिसांचे डीबी पथक अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करत असताना अनगर गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने गांजाची लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.
आपल्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिलासादायक : 48 शहरं- जिल्ह्यांमध्ये कोरोनाने एकही मृत्यू नाही https://t.co/kXSdmJ082j
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह अनगर येथील रेल्वे रुळा लगत असणाऱ्या हनुमंत शिंदे यांच्या शेतात छापा टाकला.
हणुमंत धर्मा शिंदे (वय ५५ रा. अनगर) यांनी आपल्या शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावुन त्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीची तब्बल ६५ गांजाची झाडे मिळून आली. यावेळी पोलिस पथकाने सदर गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेवून गांजाची झाडे जप्त केली.
सोलापूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रास पुण्यात केली अटक https://t.co/IDy7oDZoSV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत कदम, युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी ,पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रविंद्र बाबर, हरीष थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
सोलापुरातील 83 शाळांची घंटा वाजली, मात्र माळशिरस तालुक्यात घंटा नाही वाजली https://t.co/gXL6NQjU9f
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021