वृत्तसंस्था : एका कोरोना हॉस्पिटलला भीषण आग लागलीय. यामुळे तब्बल 58 लोकांना मृत्यू झाला तर 67 जण जखमी झाले आहेत. या मृतात कोरोनाबाधितांचाही समावेश आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. ही दुर्दैवी घटना इराकमधील नसीरिया या इराकच्या दक्षिणेकडील शहरात अल हुसैन कोविड रुग्णालयात घटना घडलीय.
Over 60 killed as fire breaks out in hospital
housing Covid-19 patients in Iraq#Iraq pic.twitter.com/oVXKx4oXs6
— Adil Razvi (@Adilrazvy) July 13, 2021
या दुर्घटनेत अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीमुळे सगळीकडे धूर पसरल्यानं अनेक कोविड रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास सुरू झाला. दरम्यान या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हॉस्पिटल गार्डने सांगितल्यानुसार, त्याने सुरुवातीला एक मोठा आवाज ऐकला. त्यानंतर हळूहळू हॉस्पिटलला आग लागली.
या भीषण आगीमध्ये तब्बल 58 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याचा व्यक्त केलाय. नसीरिय शहरातील हे रुग्णालय असून ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
Last night the city of Nasiriyah in #Iraq witnessed a horrific fire incident that broke out at the COVID ward in Al-Hussein Hospital.
Volunteers of @IraqiRCS rushed to evacuate, provide first aid and transport the wounded to the hospitals.
1/4 pic.twitter.com/zjpdiKGXSu
— IFRC Middle East and North Africa (@IFRC_MENA) July 13, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिलासादायक : 48 शहरं- जिल्ह्यांमध्ये कोरोनाने एकही मृत्यू नाही https://t.co/kXSdmJ082j
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
या आगीमुळे 67 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या भीषण आगीतून सद्य स्थितीत 18 जणांची सुटका करण्यात यश आलंय. यामध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यास अडचणी येतायत. कोरोना वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती तेथील स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी दिलीय.
ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागलीय. आगीचा भडका जोरात उडाला होता. यामध्ये काही कोरोनाबाधित होरपळून मृत झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना आगीच्या ठिकाणी दाखल होण्यास व्यत्यय येत असल्याची माहिती एका आरोग्य कर्मचाऱ्याने दिलीय.
64 people have been killed as fire rips through #Iraq COVID ward
More than 100 were also injured in the fire that broke out at the al-Hussein Teaching Hospital in the southern city of #Nasiriya late on Monday, health officials said. #Worldnbc pic.twitter.com/v2xMj5LhUp
— World NBC (@WorldNBC1) July 13, 2021
या वाईट घटनेची पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी गंभीर दखल घेतलीय. पंतप्रधानांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अल हुसैन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश पंतप्रधानांनी या बैठकीत दिले.
युद्धाच्या छायेत असणाऱ्या इराकमध्ये कोरोनाची स्थिती आता गंभीर झालेली आहे. इराकमध्ये आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 8 हजार 511 कोरोना बाधितांची संख्या आहे. 17 हजार 592 लोकांचा कोरोना मृत्यू झालेला आहे. तर, 1 कोटी 31 लाख 3 हजार 552 लोक आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले आहेत. इराकमधील आरोग्य विभाग मोठ्या कठीण काळातून जात आहे. अशात ही आगीची ही मोठी घटना घडलीय.
'त्या' महासंकटापासून चीनच वाचवणार, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते https://t.co/GfQQqplSWQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021