मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक व संगीतकार लकी अली यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक देखील केल्याचं पाहायला मिळालंय.
लकी आली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर स्वतः आदित्य ठाकरे लकी अली यांना गाडी पर्यंत सोडायला गेले याचाच संदर्भ देत लकी अली यांनी म्हटलं आहे की, ‘आदित्य ठाकरे स्वतः मला गाडीपर्यंत सोडायला आले आणि मला वडिलांप्रमाणे सन्मान दिला.’
"आदित्य ठाकरे मला गाडीपर्यंत सोडायला आले वडिलांप्रमाणे मला आदर दिला, माझी जन्मभूमी मुंबई सुरक्षित हातात आहे याचा मला आनंद आहे-लक्की अली."
प्रसिद्ध गायक लक्की अली यांनी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. #caption #luckyali #Maharashtra #Shivsena pic.twitter.com/iX1MlnGCTd
— YUVASENA WARD NO 187 (DHARAVI Vidhansabha) (@Yuvasena187) July 13, 2021
दरम्यान, मुंबई ही माझी जन्मभूमी आहे आणि माझी जन्मभूमी ही सुरक्षित हातात असल्याचा मला आनंद होत आहे, असे देखील लकी आली यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन https://t.co/3vKB0xGUmU
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
लकी आली केलेल्या कौतुकानं तर शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध गायक लकी आली यांच्या भेटीनंतर त्यांना महाराष्ट्र देशा हे पुस्तक देऊन सन्मानित केलं. तसेच त्यांच्या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मे महिन्यात गायक लकी अली यांच्या मृत्यूच्या बातम्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाल्या होत्या. पण त्या अफवा होत्या. त्यांच्या फार्म हाऊस वर असल्याची माहिती देण्यात आली होती. इंटरनेटवर सोशल मीडियात लकी अली यांच्या निधनाच्या बातम्या धुमाकूळ घालत होत्या. पण त्यांची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री नफीसा अली यांनी मीडीयाला माहिती देताना लकी अलींच्या निधनाबाबत आलेल्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं होते.
My all time favourite singer in bollywood great Lucky Ali pajji and pajji apki awaaj mein magic hai 🙏🙏👍👍 https://t.co/A8LxZBFp5q
— Vinod Yadav (@VinodYadavS_87) July 13, 2021