नवी दिल्ली : योगी सरकारने लोकसंख्या नियंत्रण धोरण आणल्यानंतर आता केंद्रातही त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. ६ ऑगस्टला यासंदर्भात राज्यसभेत चर्चा होईल. गोरखपूरचे भाजप खासदार तथा भोजपुरी अभिनेते रवी किशनदेखील लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खासगी विधेयक मांडणार आहेत. या कायद्याला सेक्युलर पक्षांकडून विरोध होत आहे. रवी किशन यांच्यावर हल्लाबोल होतोय. प्रस्ताव मांडणा-या रवी किशन या भाजप खासदारांनाच ४ मुलं आहेत, याकडे अनेकांनी लक्ष वेधून टीकेची झोड उठवली आहे.
Hypocrisy ki seema ~
Ravi Kishan is married to Priti, and they have four children, one son and three daughters. And he is supporting member of the Population control bill.@shanu_sab @AshrafFem @WasiuddinSiddi1 pic.twitter.com/Ikx8bAygvb
— Mohd Tariq Khan (@MdTariq99) July 13, 2021
या विधेयकावर ६ ऑगस्टला यासंदर्भात राज्यसभेत चर्चा होईल. भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात खासगी सदस्य विधेयक मांडलं आहे. यावर ६ ऑगस्टला चर्चा अपेक्षित आहे. राज्यसभा खासदार असलेले अनिल अग्रवाल यांनीदेखील याबद्दलचं विधेयक मांडलं आहे. गोरखपूरचे खासदार तथा अभिनेते रवी किशनदेखील लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खासगी विधेयक मांडणार आहेत.
जागतिक लोकसंख्या दिन : दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, हे असतील बंधने https://t.co/G2vmKLFMtB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
रवी किशन सध्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावी गेले आहेत. खासगी सदस्य विधेयक २३ जुलै संसदेच्या पटलावर सादर करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरण आणल्यानंतर आता केंद्रातही त्यादृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरू होईल. ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. अधिवेशनाचे १९ दिवस कामकाज चालेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Gorakhpur #MP and #BJP leader #Ravindra_shyamnarayan_Shukla,
( Ravi Kishan ) to introduce private Bill on 23 July on population control in parliament.Ravi Kishan and his wife preeti have 4 children- 3 doughter and one son. pic.twitter.com/X7bextb8NP
— Modassar Hassan (@MuddassirHafee3) July 13, 2021
खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रणाबद्दल विधेयक मांडणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता सोशल मीडियावर त्यांच्याच कुटुंबाची चांगलीच चर्चा रंगली आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा आग्रह धरणाऱ्या रवी किशन यांनाच ४ मुलं असल्याचे निदर्शनास आणून ते काय विधेयक मांडणार, अशी टीका होत आहे. काहींनी रवी किशन यांचा कुटुंबासोबतचा फोटो ट्विट केला, तर काहींनी या परिस्थितीला दिव्याखाली अंधार म्हणत खिल्ली उडवत आहेत.
* मोठा विनोद, पुन्हा ट्रोल
तीन मुली आणि एक मुलगा असणारी व्यक्ती लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार, हाच मोठा विनोद आहे, असा टोला काहींनी लगावला आहे. काहींनी थेट लोकसभेच्या संकेतस्थळावरून रवी किशन यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्रच शोधून काढलं. त्यात किशन यांनी त्यांच्या अपत्यांची माहिती दिली आहे. यामध्ये एका मुलासह तीन मुलींचा उल्लेख आहे. त्यामुळे रवी किशन सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. ट्रोल होण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही.
https://twitter.com/tweetspun/status/1414932630412226565?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1414932630412226565%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
याआगोदर रवी किशन भोजपुरी गाण्यांमधील अश्लिलता रोखण्याची मागणी केल्यामुळे ट्रोल झाले होते. रवी किशन यांनीच अनेक गाण्यांमध्ये काम केलं असून त्यात बरीच अश्लिलता होती, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. त्यात अनेकांनी रवी किशन यांचे भोजपुरी गाण्यातील फोटोही ट्विट केले होते. त्यानंतर हा मुद्दा आता समोर आला आहे.