सोलापूर : सोलापूरची कन्या असलेल्या नयना अर्जुन खांडेकर – गुंडे यांनी काल मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्या सोलापुरातील मेजर खांडेकर यांची कन्या व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन खांडेकर – गुंडे यांच्या पत्नी आहेत.
मैत्री आणि लोककार्याचा झरा : राजेशअण्णा कोठे जयंतीविशेष… (ब्लॉग) https://t.co/3yzrtrVxZi
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021
नयना गुंडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गावचे सुपुत्र डॉ. अर्जुन खांडेकर – गुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डॉ. अर्जुन गुंडे हे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
१९९२ साली नयना गुंडे यांनी प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. त्यांनी यापूर्वी कुर्डुवाडी व सोलापूर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर नाशिक विभागात म्हाडाच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नाशिक विभागातच उपमहानिरीक्षक नोंदणी विभागाचे कामकाजही त्यांनी पाहिले.
#आषाढीवारी 2021 च्या अनुषंगाने पंढरपूर शहरातून जाणारी जडवाहतुक खालील प्रमाणे नमूद पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याबाबत सूचना #सूचना #SolapurRuralPolice #पंढरपूर #surajyadigital #pandharpur #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/tn1E0TzQbi
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
२०१४ साली त्यांचे आयएएस म्हणून प्रमोशन झाले. प्रमोशन झाल्यानंतर नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुणे परिवहन महामंडळात चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, यशदा ट्रेनिंग प्रबोधनी येथे उपमहासंचालक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टमधून हेमांगी कवीने मांडलं वास्तव… कलाकारांचा हेमांगीला पाठिंबा
https://t.co/5a1Em7Y7qc— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
प्रत्येक पदावर काम करीत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांनी काम केले. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती देत शासनाने त्यांची गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मंद्रूपजवळ डंपर व दुचाकीचा सायंकाळी झाला अपघात; एक ठार, दोघे जखमी https://t.co/8CObtIIwQ6
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे परिवहन महामंडळात अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच यशदा प्रबोधिनीत उपमहासंचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. नुकतीच त्यांची गोंदिया जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. पदभार घेतल्यावर त्यांनी आपल्या माहेरचा अभिमान व्यक्त केला आहे.
अनगर गावच्या शिवारात ६६ किलो गांजा जप्त, गांजाची ६५ झाडेही हस्तगत https://t.co/TZMdf7CuJS
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021