नागपूर : नागपूरच्या मनिषनगरमधील दिलीप रेसिडेन्सीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 3 तरुणींना ताब्यात घेतले. तसेच सेक्स रॅकेट चालवणाऱ्या प्रियंका शोएब अफजल सैय्यद या महिला एजंटलाही अटक केलीय. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला एजंट तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवून रॅकेटमध्ये जबरदस्तीने ढकलत होती.
सोलापूर : फडकुले सभागृहात होणार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा https://t.co/mEyuHUeD6P
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
महिला एजंट गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेटमध्ये ॲक्टिव्ह होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी महिला एजंट तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवायची आणि या रॅकेटमध्ये ढकलायची. तरुणींचे फोटो पाठवून ती ग्राहकांना आकर्षित करायची. गेल्या काही दिवसांपासून तिनं मनिष नगरमधील दिलीप रेसिडेन्सी अपार्टंमेंटमधील 401 क्रमाकांच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरु केला होता, पोलिसांनी अशी माहिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारागृहात शिपायानेच कैद्यांना गांजा पुरवला, 8 पुड्या जप्त https://t.co/JE0GbKFIO1
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
* असा केला पर्दाफाश
गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटवर अनेक तरुणींची होणारी गर्दी पाहता शेजाऱ्यांना संशय आला. शेजारच्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय ज्ञानेश्वर भोसले यांना यांसंबंधित माहिती दिली. शनिवारी त्यांनी सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचला. पोलिसांनी एक वेशांतर पोलिसाला पाठवून मुलींची मागणी केली. त्यावेळी प्रियंकानं 5 हजार रुपयांत मुलीचा सौदा केला. काही वेळात तरुणीला आणि त्याला रुममध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर त्याने इशारा करताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी फ्लॅटवर छापा घातला.
सोलापूर : गेल्या कित्येक दिवसांपासून लस उपलब्ध नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन कुठल्याही प्रकारे लसींसाठी पाठपुरावा करीत नाही. #solapur #surajyadigital
– निहाल किरनळ्ळी, #सोलापूर
युवाध्यक्ष, आम आदमी पार्टी सोलापूर. #सुराज्यडिजिटल #solapur_needs_vaccine pic.twitter.com/zsle76ETvl— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021
फ्लॅटमधील अन्य तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या तिन्ही तरुणी गरीब घरातील आहे. त्यातील एक तरुणी ब्युटी पार्लरला कामाला होती. या प्रकरणी पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.