मुंबई : राज्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक लिमिटेडचा (निलंगा, लातूर) बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे. बिकट आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे पैसे जमा करणे व पेमेंट करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सोलापूर : फडकुले सभागृहात होणार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा https://t.co/mEyuHUeD6P
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
गेल्या महिन्यात आरबीआयने पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवरही कारवाई केली होती. बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांच्या हितासाठी सहकारी बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आरबीआयने लातूर जिल्ह्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँके (निलंगा) बँकिंग परवाना रद्द केला आहे.
कारागृहात शिपायानेच कैद्यांना गांजा पुरवला, 8 पुड्या जप्त https://t.co/JE0GbKFIO1
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उद्या दहावीचा निकाल, येथे पाहा, शिक्षणमंत्र्यांचा ट्वीट व्हिडिओ पहा https://t.co/HQAKeO8lob
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
बँकेकडे पुरेसे नसलेले भांडवल आणि भविष्यातून उत्पन्न मिळविण्याची कमी संधी या कारणाने निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्याएवढी या बँकेची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे बँकिंग परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
या कारवाईमुळे बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचा व्यवसाय बुधवारपासून बंद होणार आहे. महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक यांना पुढील कारवाई करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.
फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटला अटक https://t.co/qbMMoGUtO1
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021