अकलूज : अकलूज नगर परिषद आणि नातेपुते नगरपंचायत करण्याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्या बोलण्यावरून ते दबावाखाली असल्याचे वाटल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
📌 अकलुज
राज्य सरकार राजकीय सूड भावनेने वागत असून अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचयतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून तीनही गावचे नागरिक साखळी उपोषण करत आहेत.@CMOMaharashtra ने यावर ठोस पावलं उचलावी अशी आमची मागणी आहे. pic.twitter.com/KwET02XY20— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) July 15, 2021
अकलूज – माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगर पंचायतीस परवानगी अडवून ठेवल्याबद्दल या तीन गावचे लोक गेल्या २३ दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी दरेकर आज गुरुवारी अकलूज येथे आले होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार ही काही महाविकास आघाडीची खाजगी मालमत्ता नाही . तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेवून आला नाहीत. लोकांच्या भावनेचा अनादर केला तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. महाविकास आघाडी म्हणजे आळवावरच पाणी आहे. ते अस्थिर आहेत. ते केवळ स्वबळाचे नारे देतात. हे सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. सत्तेचा मुकूट फक्त शिवसेनेकडे परंतु विकास राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा होत असल्याने काँग्रेसही नाराज असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर त्यांनी निशाणा साधला. सकाळी एक आणि दुपारी दुसरेच बोलत असल्याचे म्हटले. त्यांनी हे ट्वीट करुनही आरोप केला आहे.
नानांच्या नाना तऱ्हा असतात. 'नाना सकाळी एक बोलतात', 'दुपारी दुसरेच' बोलतात आणि संध्याकाळी 'विड्रॉ' होतात!!
यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे याचा विचार आपण केला पाहिजे! pic.twitter.com/Onju1EurTn— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) July 15, 2021
तसेच आषाढीवारीवर प्रतिक्रिया दिली.
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे.
या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत. अकलुज येथे माध्यमांशी साधलेला संवाद..! pic.twitter.com/1BV7FZv1ad— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) July 15, 2021
दरेकर म्हणाले, तब्बल 23 दिवसांपासून उपोषण सुरू असताना देखील सरकारने अद्यापही सूड भावनेने याकडे दुर्लक्ष केले आहे.अधिवेशन पूर्ण दिवसांचे झाले असते तर आम्ही या सरकारला जाब विचारला असता. पण हे पळपुटे सरकार आहे. विरोधकांना घाबरुन यांनी अधिवेशन गुंडाळले. लवकरच हे सरकार पडेल, मग आम्ही यांचे हिशेब चुकते करु, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ #surajyadigital #पीकविमा #सुराज्यडिजिटल #PMKisan #cropinsurance
– अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार योजनेत सहभागासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. pic.twitter.com/dA225gyG34— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
ग्रामीण भागांचे शहरीकरण होत असताना सरकारने अशा विषयात राजकारण करायला नको होते. दुर्दैवाने नगरपरिषद, नगरपंचायतसाठी संघर्ष करावा लागत आहे. विजयदादांनी संपूर्ण राज्यात विकास निधी देताना कधीच राजकारण केले नाही. सध्याचे सरकार आडमुठे धोरणाने वागत असल्याचा आरोप आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी केला.
हा विषय राजकारणाचा नसून संबंधित गावांतील नागरिकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,श्री.शिवतेज सिंह मोहिते पाटील, pic.twitter.com/faRT77qGkZ— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) July 15, 2021
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील, आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, आ. प्रशांत परिचारक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहीते पाटील, नंदिनीदेवी मोहीते – पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहीते पाटील, पंचायत समिती सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, किरण धाइंजे, नितीन मोरे अजित मोरे, प्रवीण साळवे , मामासाहेब पांढरे, मुक्तार कोरबु, नवनाथ गायकवाड, फतीमा पाटावाला यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थित होत्या.