लंडन : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या खेळाडूंचे नाव देण्यात आले नाही. यातील एका खेळाडूची कोरोना चाचणी आता निगेटीव्ह आली आहे. तर एक खेळाडू आयसोलेशनमध्ये आहे. येत्या रविवारी त्याची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. इतर खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर अनेक भारतीय खेळाडू फिरताना दिसून आले होते.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कसोटी संघातील 2 क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. अशी बातमी असली तरीही, अद्याप त्या क्रिकेटपटूंचे नाव पुढे आलेले नाही. तसेच बीसीसीआयनेही यासंदर्भात कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
COVID-19: Two Indian cricketers tested positive in UK, one still in isolation but asymptomatic
Read @ANI Story | https://t.co/R4hL96y4rQ pic.twitter.com/P41Woi029x
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2021
त्यातील एका क्रिकेटपटूने इंग्लंडमध्ये आपल्या नातेवाईकाच्या घरी स्वत:ला एकांतवासात (सेल्फ क्वारंटाईन) ठेवले आहे. दुसरा क्रिकेटपटू कोरोनाची लागण झाल्यानंतर आता उपचारानंतर निगेटिव्ह आढळला आहे. तरीही तो रविवारपर्यंत (18 जुलै) विलगीकरणात राहणार आहे. सुखद बाब म्हणजे, हे दोन्ही क्रिकेटपटू डर्हम कसोटीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांची परत चाचणी केली जाणार आहे.
4 ऑगस्टपासून होणा-या सामन्यांपूर्वी भारतीय संघ विश्रांतीसाठी रजेवर होता. आता सुट्टी संपली आहे, तेव्हा भारतीय खेळाडू कसोटी सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. तथापि, या सामन्यापूर्वी खेळाडूंसाठी कोरोना चाचणी अनिवार्य असल्याने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कोरोना चाचणी सुरू केली गेली आहे. (इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना कोविड चाचणी करावी लागेल.)
BCCI mourns the sad demise of Shri Yashpal Sharma
— BCCI (@BCCI) July 13, 2021
भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडला कोरोना लसीचा पहिला डोस घेऊन रवाना झाले. यानंतर 7 आणि 9 जुलै रोजी इंग्लंडमधील खेळाडूंना दुसरा डोस देण्यात आला. क्रिकेट बझच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयने इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मदतीने खेळाडूंना दुसरा डोस दिला. खेळाडूंना दुसरा डोस मिळाल्यानंतर लगेचच खेळाडूंची कोरोना टेस्ट सुरू केली जाते. खेळाडूंच्या कुटूंबाची कोरोना चाचणीही सुरू झाली आहे. त्यात इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील 2 क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे वृत्त आहे.
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन https://t.co/3vKB0xGUmU
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 13, 2021
कोरोनाग्रस्त भारतीय क्रिकेटपटूंपैकी एकाच्या घशात खवखऊ लागल्याने त्याने कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्याने स्वत:ला एकांतवासात ठेवले आहे. मात्र त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. याबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही 3 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला होता.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार त्या खेळाडूचे नाव समोर आले आहे. इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त आज माध्यमात झळकले. या खेळाडूचे नाव आता समोर आले आहे. रिषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सध्या तो आयसोलेशनमध्ये असून रविवारी त्याची कोरोना चाचणी पुन्हा होणार आहे. फुटबॉल सामना पाहताना रिषभ पंतचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले होते. दरम्यान टीम इंडियातील इतर खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.