वेळापूर : सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका तर तालुक्यात वेळापूर गावाने कोरोना संसर्गात धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज शुक्रवारी ( १६ जुलै) जिल्ह्याचे आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट घेऊन वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचे आढावा घेतला, तसेच ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, पोलीस प्रशासनाला देऊ केल्या.
ब्रेकिंग – दहावीत किती विद्यार्थी नापास झाले ? 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के https://t.co/gx41i6AtoA
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
सोलापूर जिल्ह्याच्या कोरोना संसर्गात माळशिरस तालुका पुढे येत आहे तर माळशिरस तालुक्यात माळीनगर, माळशिरस व वेळापूर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांवर आहे. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज या गावांना भेटी दिल्या.
यावेळी वेळापूर गावात फेब्रुवारी पासून ७२१ पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या असून वेळापूरचा पॉझिटिव्ह रेट ५० टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मिटिंगसाठी येताना गावातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक आदी परिसरात मोठी गर्दी असल्याची खंत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी व्यक्त केली.
मोदी सरकारचा धिक्कार
सोलापूर : इंधन दरवाढीविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आज बोंबाबोंब आंदोलन केले #fuel #Congress #surajyadigital #hike #FuelPriceHike #MLA #सुराज्यडिजिटल #modi #मोदीसरकारhttps://t.co/DamkGDAXOx— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका; ईडीने करोडोंची संपत्ती केली जप्त https://t.co/o0elpwNYBC
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गावातील होम आयसोलेशन बंद करून तातडीने डायट येथील कोविड केअर सेंटर सुरू करून पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर न जाऊ देता तेथे ठेवा यामुळे कॉन्टॅक्ट मध्ये येऊन पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होईल, असे आदेश दिले.
तालुक्यासोबतच वेळापूरची वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी दर सोमवारी व्यापारी वर्गांचे टेस्टिंग करून त्यानंतर पुढील आठ दिवस दुकान सुरू ठेवण्यास त्यांना परवानगी द्यावी, नंतर पुन्हा टेस्ट करून आठ दिवस दुकाने उघडावीत, त्याचबरोबर चौकात, स्टँड वरती, प्रमुख व्यापारी पेठेत भरारी पथक पाठवून कोविड 19 च्या रॅपिड टेस्ट करण्यात याव्यात तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून टेस्टिंग वाढण्यावर भर द्यावा, वेळ संपल्यानंतरही सुरु राहत असलेल्या भाजीमंडइतील व्यापार्यांनवर दंड आकारुन पोलीसांनी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिल्या.
या फोटोला कॅप्शन सुचवा, इंधन दरवाढीने जनता त्रस्त झाल्याचे काही छायाचित्रे #surajyadigital #FuelPriceHike #इंधनदरवाढ #सुराज्यडिजिटल #caption #images #pepole pic.twitter.com/OZWB2vAmsB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बापू ओव्हाळ, उपसरपंच जावेद मुलाणी, ग्रामविकासअधिकारी दिपक गोरे, तलाठी तोरके, वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे बैठकीला उपस्थित होते.
This site is my inhalation, really fantastic layout and Perfect content.
Hello there, I discovered your online web site by way of Google acquire the best for a related topic, your internet site emerged, it appears fantastic. We have saved it during my google social bookmarks.
I can look for the reference to a site with the information on a theme interesting you.