विरवडे बु : मोहोळ – विजापूर रोडवरील कामती बु चौकातील जुन्या पोलीस स्टेशनसमोर मालाने भरलेला ट्रक चालकाचा ट्रॅकवरील ताबा सुटल्यामुळे उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड कोसळून मोठी दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू, आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती https://t.co/9To7DNUnS9
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
वाहन क्रमांक टी एन 28 ए एफ 9689 असा आहे. चालक व किनर सुरक्षित आहेत. मात्र पोलीस ठाण्याच्या समोर लावलेल्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कामती पोलीस स्टेशन नवीन जागेत गेल्यामुळे येते कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अगदी पोलीस ठाण्याच्या समोरच हे वाहन पलटी झाले आहे. धोकादायक वळणामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भर सामन्यादरम्यान गोळीबार, एका महिलेसह दोन दर्शक गंभीर जखमी, प्रेक्षकांचा किंचाळण्याचा आवाज, पहा व्हिडिओhttps://t.co/aZ9CmKXb4R
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
त्यामुळे अपघात झाला. पोलीस ठाण्यातील तीन चाकी प्रवासी टमटम, पिकअप, व छोटा हत्ती या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मोहोळ – कुरुल – कामती ते विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. कामती गावातून हा मार्ग गेल्यामुळे येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी अनेक वेळा गतिरोधकची मागणी केली आहे.
23 जणांचा मृत्यू, केंद्राकडून दोन तर राज्याकडून पाच लाखांची मदत जाहीर, हवामान विभागाकडून 18 ते 22 ॲलर्ट जारीhttps://t.co/JHnMWc1Tgd
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
मागणी करुनदेखील गतिरोधक करण्यात आला नाही. गावाच्या जवळ मोठे वळण आहे. अन गतिरोधकदेखील नाही. त्यामुळे वाहनाचा वेग जास्त असतो. वेग जादा असल्याने अनेकदा वाहनांवर नियंत्र राहत नसल्याने या ठिकाणी छोटे अपघात झाले आहेत. कामती बु ग्रामस्थांकडून या रोडवर गावच्याजवळ गतिरोधक करण्याची मागणी होत आहे.
टॉपटेन 10 बेस्ट सेलिंग कार, टॉप 10 कार विक्रीचे आकडे #car #topten #lemonnews #लेमनन्यूज #bestselling #carsales pic.twitter.com/wvBvNJi0r8
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021