वाशिंग्टन : अमेरिकेत शनिवारी (१७ जुलै) एक बेसबॉल सामना खेळला गेला. बेसबॉल सामना पाहण्यासाठी देखील चाहत्यांनी खचाखच गर्दी केली होती. त्याचवेळी भर सामन्यादरम्यान थरकाप उडवणारी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. यात दर्शक पूर्णपणे घाबरून गेले होते. पळापळ झाली. हा गोळीबार क्षुल्लक वादातून झाला होता.
You can hear the gunshots just as the broadcast cuts away pic.twitter.com/tBmbZaR3GB
— Jack Leonardi (@JackLeonardi) July 18, 2021
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा परिणाम खेळांवर देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली गेली असली तरीदेखील प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जात नव्हती. परंतु आता परिस्थिती सावरत असल्यामुळे प्रेक्षकांना देखील मैदानात येऊन सामना पाहण्याची परवानगी दिली जात आहे. अशातही घटना घडली आहे.
https://twitter.com/alexsalvinews/status/1416574135178862601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416574135178862601%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
अमेरिकेत शनिवारी (१७ जुलै) एक बेसबॉल सामना खेळला गेला. या सामन्यातील ६ व्या डावात सामना अगदी रंगतदार स्थितीत पोहोचला होता. प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढू लागली होती की, कोणता संघ या सामन्यात माजी मारेल? इतक्यात स्टेडियममध्ये धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसह खेळाडू आणि पंचही घाबरले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी संपूर्ण मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमत होता. इतक्यात स्टेडियममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक उत्साह थांबला आणि प्रेक्षकांचा किंचाळण्याचा आवाज सुरू झाला. मैदानाच्या बाहेर जोरदार गोळीबार सुरू होता. हा आवाज ऐकताच प्रेक्षकांचा थरकाप उडाला तर होताच, पण पळापळही चालू झाली.
https://twitter.com/JustinBeland/status/1416573729014943750?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416573729014943750%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात २ लोक गंभीर दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यानंतर आणखी एका महिलेचा उल्लेख करण्यात आला होता, जी सामना सुरू असताना काही कारणास्तव स्टेडियमच्या बाहेर गेली होती. त्यावेळी तिला गोळी लागली होती. ती महिला आता ठीक आहे. तसेच उर्वरित दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोन गाड्यांमधून एका आरोपीला अटक केले आहे. तर दुसऱ्याचा शोध घेणे अजूनही सुरू आहे. गोळीबार झाली तेव्हा हा खेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी नॅशनल संघ ८- ४ ने पिछाडीवर होता.
You can hear the gunshots just as the broadcast cuts away pic.twitter.com/tBmbZaR3GB
— Jack Leonardi (@JackLeonardi) July 18, 2021
पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ही घटना स्टेडियमच्या बाहेर २ गाडी चालकांमध्ये झालेल्या वादातून घडली. त्यामुळे त्यांच्यात जोरदार गोळीबार झाला होता. गोळीबार झाल्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा थरकाप उडाला होता. हे सर्व सुरू असताना प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर जाण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. त्यांना स्टेडियममध्येच बसून राहण्यास सांगितले होते. परंतु काही वेळानंतर त्यांना स्टेडियमचा दुसरा रस्ता सेंटरफिल्ड आणि राईटफिल्ड गेटमधून बाहेर काढण्यात आले होते.