रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीचे पाणी गावात शिरले आहे. जवळपास 5 हजार लोक अडकले आहेत. संपूर्ण शहरात पाणी आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. चिपळूणचे बस स्थानक पाण्याखाली गेले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. येथील रेल्वे स्थानकात काही गाड्या थांबल्या आहेत.
स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. रत्नागिरी मधून 1 , पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अशा 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत. पुणेहून एनडीआरएफाच्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत.तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे.
प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती चिपळूणधील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. चिपळूण शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत.
ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी असून बाजारपेठ पाण्याखाली आहे. घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
मराठी अभिनेता अशुमन विचारे यांनी सोशल मीडियावर चिपळूनचा व्हिडिओ टाकून चिंता व्यक्त केलीय. कोरोनाच्या संकटानंतर भरीसभर म्हणून हे निसर्गाचं आणखी एक रौद्र रूप कधी सावरणार आमचं चिपळून, अशी काळजी व्यक्त केलीय.
चिपळूणमध्ये हेलिकॉप्टर सुविधा पोहोचविण्याचे तातडीने आदेश / अपडेट
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या ठिकाणी हेलिकॉप्टर सुविधा पोहोचविण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. तसेच NDRF च्या दोन टीम रवाना झाल्या आहेत. कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध केले जात आहे. चिपळूण शहरात 5 हजार लोक अडकले आहेत. अनेक घरात पाणी शिरले आहे.
रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. वाशिष्टी आणि शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रत्नागिरीहून चिपळूसाठी स्पीड बोट रवाना करण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीमही चिपळूणात दाखल होणार आहे. कोस्ट गार्ड हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने लोकांना रेस्क्यू करणार आहे. पुढील आठवडा पुरेल इतका अन्न धान्यांची व्यवस्था करणार करण्यात येत आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे.
* महामार्गावरील वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने हजारो लोक पाण्यात अडकले आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तातडीने मदत पाठवण्यीच मागणी केली आहे. तसेच पाच हजार लोकांचे स्तलांतर करावे लागणार असल्याचे, राऊत यांनी सांगितले. शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गायब झाले आहेत.