मुंबई : राज्यात डेंग्यूचे हजारांच्यावर रुग्ण आढळले आहेत. तर यात पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रभाव अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. तोच डेंग्यूच्या आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यात सध्या डेंग्यूचे १ हजारापेक्षा अधिक रुग्ण असून, गेल्या 4 महिन्यात ५ रुग्ण दगावले आहेत.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही तिन्ही बालके आहेत. दरम्यान, डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग असून, एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याद्वारे तो प्रसारित होतो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग असून, एडिस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे प्रसारित होतो. एका डासाच्या चाव्यानंतर पाच – सहा दिवसांनंतर या आजाराची लागण होते. डेंग्यू ताप हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. यामुळे मृत्यूही ओढावू शकतो. यास हलके घेणे जीवावर बेतू शकते. वेळीच उपचार घेऊन यावर मात करता येऊ शकते.
पुण्यात ३६ रुग्ण असून, हजारापेक्षा जास्त संशयित आहेत. विदर्भात ३६८ रुग्ण आढळले असून, तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. नागपूरमध्ये १९४, यवतमाळमध्ये ६७, वर्धा येथे ४९, अमरावतीत २५०, चंद्रपूरमध्ये २२, बुलडाणा येथे ७, भंडाऱ्यात ४ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. मराठवाड्यात डेंग्यूचे ११० रुग्ण गेल्या काही महिन्यांत आढळले आहेत. यातील सर्वाधिक ६८ रुग्ण नांदेड जिल्ह्यात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २१, औरंगाबाद जिल्ह्यात १३, परभणी जिल्ह्यात ४ तर बीड आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोल्हापूर जिल्ह्यात १२४, सांगलीत १२ तर सातारा येथे ९२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये २ तर सिंधुदुर्गमध्ये ६९ रुग्णांची नोंद झाली असून, ठाण्यात १७ रुग्णांची नोंद झाली असून, २ रुग्ण दगावले आहेत. नाशिकमध्ये डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाचेही ११७ रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही तिन्ही बालके आहेत.
हा डेंगू साचलेल्या पाण्याची डबकी, कचरा, अस्वच्छता यामुळे डेंग्यूच्या आजाराची शक्यता वाढली आहे. राज्यात सध्या डेंग्यूचे १ हजारापेक्षा अधिक रुग्ण आहेत. गेल्या चार महिन्यांत पाच रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे उपचार आणि काळजी घेणे महत्त्वाचे आहे.