नवी दिल्ली : नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचे आठ महिन्यांपासून जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे. यावर केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत वादग्रस्त विधान केले. त्या म्हणाल्या की, दिल्लीत आंदोलन करत असलेल्यांना कार्यकर्त्यांना शेतकरी म्हणणे थांबवा, ते शेतकरी नाहीत मवाली आहेत. खऱ्या शेतकऱ्यांना जंतर मंतरवर येऊन आंदोलन करायला वेळ नाही. ते त्यांच्या शेतात काम करत असल्याचे विधान केले.
भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मीनक्षी लेखी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या ‘ सर्वप्रथम त्यांना शेतकरी म्हणणे थांबवा. कारण ते शेतकरी नाहीत. खऱ्या शेतकर्यांना जंतर मंतरवर येऊन आंदोलन करायला वेळ नाही. ते त्यांच्या शेतात काम करत आहेत’. या वक्तव्याने आंदोलकाची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहव लागेल.
कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलक दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक चर्चा झाल्या परंतु यावर काही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकारही माघे हटण्यास तयार नाही. परंतु, 26 जानेवारी रोजी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या या प्रदर्शनाला अटींसह मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 22 जुलै ते 9 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 पर्यंत प्रदर्शनासाठी परवानगी असणार आहे. सभागृहात एकीकडे देशाची संसद चालणार आहे तर दुसरीकडे जंतर मंतरवर शेतकऱ्यांची सलग 19 शेतकरी संसद सुरु राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत हे शेतकऱ्यांसमवेत दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले आहेत. यापूर्वी ते सिंधू बॉर्डर असून बसव्दारे ते प्रदर्शन स्थळावर आले. प्रदर्शनात 200 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. आम्ही याव्दारे संसदेतील कार्यवाहीवर लक्ष ठेवणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. त्यामुळे जंतर मंतरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे की आम्ही नव्या कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे, कृषी कायद्यातील ज्या गोष्टींवर शेतकऱ्यांना आक्षेप आहे, त्याबद्दल आम्हाला सांगवं, सरकार नेहमीच शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे
मीनाक्षी लेखी यांनी केलेल्या टीकेला शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं आहे. शेतकरी मवाली नाहीत, शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शांततेत आंदोलन करण्याचा हा एक मार्ग आहे. जोपर्यंत संसदेचं काम सुरु आहे तोपर्यंत आम्ही इथे येत राहू, सरकारला वाटत असेल तर चर्चा होऊ शकते, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
* विरोधी पक्षांकडून आंदोलकांना प्रोत्साहन
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आजपासून सुरू केलेल्या किसान संसदेबाबत प्रतिक्रिया देताना मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, हे शेतकरी नाहीत तर मवाली आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. या सर्व गुन्हेगारी कारवाया आहेत. २६ जानेवारीला जे काही झाले होते. तेसुद्धा लाजीरवाणे होते. गुन्हेगारी कृत्ये होती. त्यात विरोधी पक्षांकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले गेले. मीनाक्षी लेखींच्या या विधानावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.