विरवडे बु : कुरुल ते पंढरपूर हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. हा राज्य महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुहास घोडके यांच्या नेतृत्वाखाली कुरूल चौकातील खड्यामध्ये रक्तदान आंदोलन करण्यात आले. खड्डयांचे पूजन वयोवृद्ध शेतकरी सौदागर जाधव यांच्या हस्ते केले तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मुखवटा लावून करण्यात आले. या शिबिरात रक्तनात दात्यात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सुहास घोडके यांनी रक्तदान करून शिबिराची सुरवात केली. या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी अपघातांमध्ये शेकडो जण जखमी व अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. या रस्त्यासाठी अनेकदा मागणी करूनही याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी हे अनोखे रक्तदान शिबिर घेतले गेले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कुरुल चौकातील पंढरपूर रोडवर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये कोरोना चे सर्व नियम पाळून रक्तदान आंदोलन केलं आहे. लोकप्रतिनिधीचा जाहीर निषध या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी कुरुल ते पंढरपूर रस्त्यावर व लगत असणाऱ्या सर्व गावातील सामाजिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते व रस्त्यातील खड्ड्याचे लाभार्थी असणाऱ्या वाटसरूंनी सहभाग नोंदवाला.