नवी दिल्ली : क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या ‘मी ब्राह्मण आहे’… यासंदर्भातील वाक्यावरून वाद झाल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने ‘नेहमीसाठी राजपूत, जयहिंद’ ! असे ट्विट केले आहे. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी दोघांवरही टीका केली आहे. जात, धर्म आणि रंग, याला अर्थ नाही, अशा कमेंट्स क्रिकेट चाहत्यांनी केल्या आहेत. ‘एवढ्या प्रतिष्ठीत पातळीवर जातीचे प्रदर्शन.. लाजिरवाणे’, अशा शब्दातही टीका करण्यात आली आहे.
जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. 4 ऑगस्टपासून भारताला इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. हा सराव सामना अनिर्णित राहिला. परंतु रवींद्र जडेजाने या सामन्यात फलंदाजी शानदार प्रदर्शन केले. जडेजाने दोन्ही डावात अनुक्रमे 75 आणि 51 धावा केल्या.
तर सुरेश रैनाने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता धोनी आणि रैना आपल्याला आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावर खेळताना दिसतात. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे निश्चित केले गेले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सुरेश रैनाची आणी जडेजाची चूक
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने तामिळनाडू प्रीमियर लीग दरम्यान समालोचन करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. समालोचन करताना म्हणाला होता की, तो एक ब्राह्मण आहे आणि यामुळेच त्याला चेन्नईची संस्कृती आत्मसात करण्यासाठी जास्त अडचणी आल्या नाहीत.
यावरूनच सोशल मीडियावर रैनावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. इतकेच नव्हे तर आता यामध्ये रैनानंतर चेन्नई सुपर किंग्स संघातील त्याचा साथीदार रवींद्र जडेजाचेही नाव यात ओढावले गेले आहे. त्यानंतर रविंद्र जडेजाची सोशल मीडियावर फजिती झाली. टीकेला सामोरे जावे लागले.
जडेजाने नुकतेच हे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सदैव राजपूत मुलगा (राजपूत बॉय), जय हिंद.’ जडेजाने केलेले हे ट्विट चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. जडेजाच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले की, ‘जडेजाकडून अशा ट्विटची अपेक्षा नव्हती. अशा पद्धतीने खेळामध्ये जातीवाद निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे.’