हंगेरी : युरोपच्या हंगेरी येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने या स्पर्धेत 75 किलोग्राम वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत केले. दरम्यान, प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं.
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. यापूर्वी काल शनिवारी (ता. 24) मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. त्यानंतर आता प्रिया मलिकने मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे आनंद व्दिगुणीत झाला आहे.
प्रियाने मिळवलेल्या सुवर्ण यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियातून अनेकजण प्रियाचे कौतुक करत आहेत. हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंह यांनीही प्रियाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक जिंकले. हरयाणाच्या या मुलीचे अभिनंदन.’
यंदा जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताने यश मिळवले आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हंगेरी इथं झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. काल शनिवारी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर प्रियाच्या सुवर्णपदकाने भारतीयांचा आनंद द्विगुणीत केला आहे.
75 किलो वजनी गटात प्रियाने बेलारुसच्या कुस्तीपटूचा 5-0ने दणदणीत पराभव केला. प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक, 2019 मध्ये दिल्लीत झालेल्या 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिने 2020 मध्ये झालेल्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये सुवर्ण जिंकले होते.
याआधी युवा कुस्तीपटू तनुनेही 43 किलो, तर प्रियाने 73 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. अंतिम सामन्यात तनुने बेलारुसच्या वालेरिया मिकिसिचचा पराभव केला होता. तर प्रियाने बेलारुसच्याच सेनिया पटापोविचला पराभूत केले होते. तर 65 किलो वजनी गटात वर्षाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रिया मलिकच्या यशामध्ये तिचे प्रशिक्षक अंशु मलिक यांनी मोठी भूमिका साकारली आहे. प्रियाने सन 2020 मध्ये झालेल्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये सुवर्ण जिंकले. याशिवाय गेल्या वर्षी पाटण्यात झालेल्या राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. एक दिवस प्रियाने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे, असे त्यांचे स्वप्न आहे.
* सुपरस्टार मेरी कोम पदकाच्या दिशेने
भारताची बॉक्सिंग सुपरस्टार मेरी कोमनं टोकियो ऑलिम्पिकमधील आपला पहिला विजय मिळवला आहे. मेरीसाठी हा सामना जिंकणं सोपं नव्हतं. परंतु, मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सामना आपल्या बाजूनं फिरवला. महिला बॉक्सिंगमधील पहिला सामना जिंकत मेरीनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. मेरी कोमनं हर्नांडिज गार्सियाचा पराभव करत पुढची फेरी गाठली आहे. सामन्याची सुरुवात झाल्यापासूनच मेरी कोमच्या अुभवाची झलक पाहायला मिळाली. मेरी विरोधी खेळाडूला अटॅक करण्याची फारशी संधी देत नव्हती. खेळाडूपासून अंतर ठेवूनच मेरी खेळताना दिसून आली. पहिल्या राऊंडनंतर मेरीला थोडा फायदा मिळताना दिसून आला. पहिल्या राऊंडनंतर मेरी आक्रमक खेळी करताना दिसून आली. मेरीनं तिसऱ्या राउंडमध्ये येताच अटॅक करणं सुरु केलं.