सोलापूर : कामावरून निलंबित केल्याचा राग धरून एका कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये जाऊन ‘तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो अशी धमकी दिली, ही घटना चिंचोली एमआयडीसी येथील व्यंकीस लिमिटेड कंपनीत शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश सदाशिव साबळे (वय३२रा. बाळे ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साबळे याला कंपनीने निलंबित केले होते. त्याचा राग मनात धरून काल शानिवारी सकाळच्या सुमारास तो व्यवस्थापकाच्या केबीन घुसला. तु मला निलंबित कसे केले ? असे म्हणत तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली, अशा आशयाची फिर्याद जयानंद मलकारी कांबळे (वय ५२ रा. सोलापूर) यांनी मोहोळ पोलिसात दाखल केली. हवालदार चवरे पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* इन्शुरन्स कंपनीच्या शाखाप्रमुखानेच मारला तिजोरीवर डल्ला
सोलापूर : स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करून तिजोरीतून ६४ हजार शंभर रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि.२३ जुलै) घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,भद्रावती पेठेतील बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेडच्या शाखेत शाखाधिकारी म्हणून आसिफ इक्बाल कनकगेरी (रा. हुबळी,कर्नाटक) हा नव्याने रूजू झाला होता. त्याच्याकडे लॉकरच्या चाव्या ठेवण्यात आल्या होत्या.
त्याने पदाचा दुरूपयोग करून तिजोरीतून ६४ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली,अशी फिर्याद श्रीकांत शंकर डूम (डेप्यूटी मॅनेजर) (उपशाखाप्रमुख) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. स्वत:च्या फायद्यासाठी कनकगेरी याने कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.त्याच्याविरूध्द ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची नोंद जेल रोड पोलिस ठाण्यात झाली असून,पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करंडे हे करीत आहेत.