कोल्हापूर / ठाणे : कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला आहे. मात्र आता पाऊस कमी होत आहे. पण तरी देखील कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंदच आहे. राधानगरी धरण 98.38 टक्के भरले आहे. या धरणाचा एक दरवाजा दुपारपर्यंत खुला केला केल्याचे वृत्त आहे. पंचगंगा नदीतील पाणी पातळी कमी होत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असली, तरी घरी जाण्याची घाई लगेच करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र ठाणेकर कोल्हापूरच्या दुधाला मुकले आहेत. ठाणे शहरात दररोज साडेपाच ते सहा लाख दूध येते असल्याची आकडेवारी आहे.
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. त्यामुळे अनेक लोक बेघर झालेत. पूराच्या पाण्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक महत्वाचे रस्ते पूराच्या पाण्यामुळे बंद केले आहेत. कोल्हापूरच्या आत येता येत नाही ना बाहेर जाता येत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महापुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शिरोली पुलाजवळ बंद केला आहे. कोल्हापुरातून हायवेला जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. पुरामुळे मुख्य मार्गच बंद केल्यामुळे गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे.
अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.
अत्यावश्यक कामाच्या वेळीही रस्त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कुणीही रोडवर जाऊ नये, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे.
रस्त्यांची माहिती घ्यावी, तसंच पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीच्या दृष्टीनं व्यवस्थित रस्त्याची माहिती देण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं, असंही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
दुधाची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. ठाणे शहरात साडेपाच ते सहा लाख दररोज दूध येते. गोकुळ दुधाची सर्वाधिक खरेदी होत असते. अतिवृष्टी झाल्याचा फटका कोल्हापूरच्या दुधाच्या आवकवर झाला आहे. कोल्हापूरमधून केवळ ३० टक्केच ठाण्याला दूध मिळत आहे. त्यामुळे आज रविवारी कोल्हापूरच्या दुधाला ठाणेकरांना मुकावे लागणार आहे. कोल्हापूरवरून येणाऱ्या गोकुळ, वारणा आणि काहीसा अमूलला फटका बसला आहे. येथून फक्त ३० टक्के दूध येत असल्याचे वृत्त आहे. दुधाचा तुटवडा भरून काढण्यासाठी इतर कंपन्यांच्या दुधाची विक्री होणार असल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेकडून सांगितले आहे.
* हे महामार्ग बंद
– कोल्हापूर ते गारगोटी दुधगंगा कारखानाजवळ – बंद आहे
– कोल्हापूर ते राधानगरी – बंद आहे
– कोल्हापूर ते गगनबावडा (दोनवडे, कळे, मांडुकली) याठिकाणी बंद आहे
-कोल्हापूर ते पन्हाळा, शाहूवाडी, आंबा – बंद आहे
-कोल्हापूर ते रत्नागिरी – बंद आहे
-कोल्हापूर ते पुणे – बंद आहे
-कोल्हापूर ते सांगली – बंद आहे
-कोल्हापूर ते बेळगाव – बंद आहे
– कोल्हापूर ते सिंधुदुर्ग/गोवा