वेळापूर : माळशिरस तालुक्यातील दसूर येथे जनावरे रस्त्यावर बांधण्याच्या कारणावरुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. मृत हा पोलिस पाटीलाचे वडील आहेत. तसेच पोलीस पाटील आणि त्यांच्या भावालाही मारहाण झाली आहे.
मृत अशोक मुकुंद शिंदे यांना ” तू रोडवर गुरे बांधतो, म्हणून चार ते पाच जणांच्या मारहाणीत व सिमेंटच्या रोडवर उचलून आपटून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. दसूर पोलिस पाटील यांचे वडील आहेत. अशोक मुकुंद शिंदे असे मयताचे नाव आहे. याची वेळापूर पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, याबाबत फिर्यादी राहुल अशोक शिंदे (रा. दसुर ता. माळशिरस) यांनी वेळापुर पोलिसात फिर्यादी दिली. फिर्यादीचे वडील अशोक मुकुंद शिंदे हे दिनांक आज सोमवारी नेहमीप्रमाणे घरातून खळवे गावचा शिवारातील शेतात पायी चालत गेले होते. सकाळी नऊच्या सुमारास राहूल अशोक शिंदे हे घराच्या समोर बसलेले असताना त्यांचे वडील अशोक शिंदे हे शेतातून पायी चालत परत घराकडे येत असताना अशोक शिंदे यांना नात्याबाबा शंकर माने, त्यांची दोन मुले प्रशांत नात्याबाबा माने, बजरंग नात्याबाबा माने, पत्नी सिंधुबाई नात्याबाबा माने, मुलगी सोनाली नात्याबाबा माने या सर्वांनी अशोक शिंदे यांना हटकले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोडवर थांबवून तुम्ही तुमची जनावरे रस्त्यावर कशाला बांधता, रस्त्याच्या खाली जनावरे बांधत जावा, आमच्या पोरांना कार गाडी घरासमोर सिमेंट काँक्रीट रोड वरून घेऊन आल्यानंतर जनावरे उठत नाहीत, बाजूला सरत नाहीत, गाडी थांबवून जनावरे हाकलावे लागत आहेत. जनावरे रस्त्यावर कशाला बांधता, असे म्हणत सर्वांनी अशोक शिंदे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशोक शिंदे यांना उचलून रोडवर जोरात आपटले आणि त्यांना रोडवर खाली पडून मारहाण केली.
फिर्यादी राहुल अशोक शिंदे व त्याचा चुलत भाऊ हरिदास केशव शिंदे यांनी पाहिले आणि वडिलांना सोडवण्यासाठी भांडणांमध्ये गेले असता या दोघांनाही मारहाण केली. यावेळी शेजारी संभाजी काळे, लक्ष्मण दादासो कागदे, शहाजी भैरू ढाळे यांनी येऊन भांडणे सोडवा सोडवी केली. सर्वांनी वडील अशोक शिंदे यांना रोडवर आपटून मारहाण केल्याने ते बेशुद्ध होऊन पडले होते त्यांच्या तोंडातून लाळ येत होती. तसेच मारहाणीत फिर्यादी राहुल अशोक शिंदे यालाही डाव्या हाताला जखम झाली आहे व त्याचा चुलत भाऊ हरिदास केशव शिंदे याच्या डोळ्याला किरकोळ मार लागून जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादिचा थोरला भाऊ महेश अशोक शिंदे यास सदर भांडणाची माहिती मिळताच त्याने स्वतःची कार घेऊन तेथे आला, बेशुद्ध पडलेले त्यांचे वडील अशोक शिंदे यांना कारमधून लगेच अकलूज सरकारी दवाखाना गाठले. उपचारासाठी दाखल केले. अशोक शिंदे हे उपचार करण्यापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.
यात नात्याबाबा शंकर माने, प्रशांत नात्याबाबा माने, बजरंग नात्याबाबा माने, सिंधुबाई नाथत्याबाबा माने, सोनाली नाथत्याबाबा माने यांच्याविरोधात कलम 302, 323, 504, 506, 143, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे वरील सर्वांवर वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.