बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आपला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज सोमवारी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. अखेर घोषणा केल्याप्रमाणे येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पद सोडले, मात्र तीन अटी ठेवल्याची चर्चा सुरु आहे.
कर्नाटकात खांदेपालट होण्याचे संकेत गेल्या कांही दिवसापासून वर्तवण्यात येत होते. भाजपाअंतर्गतही यावरुन संघर्ष सुरुच होता. त्यानंतर कांही दिवसापूर्वीच येडीयुरप्पा यांनी स्वतःहून आपण कार्यकाळ संपल्यावर पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर पद सोडू. पक्षाने आपल्याला भरपूर दिले असून पक्षशिस्त मोडणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी येडीयुराप्पा पद सोडणार हे स्पष्ट झाले होते. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला. नवीन मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, लक्ष्मण सवदी, न्थ नारायण, संतोष बोम्मरबेटू यांची नावे चर्चेत आहेत.
अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लंचनंतर आज मी राज्यपालांची भेट घेणार आहे, असे येडियुरप्पा यांनी म्हटले होते. दरम्यान येडियुरप्पा राजीनामा देणार, अशी चर्चा गेल्या 8 दिवसांपासून सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. अखेर येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामाही दिला.
कर्नाटकमधील येडियुराप्पा सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. आपण राजीनामा देणार नसल्याचे येडियुरप्पांनी म्हटलं होते. त्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू होतं.
गेल्या अनेक आठवड्यांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर आज येडियुरप्पांनी व्यासपीठावरून राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं येडियुरप्पा म्हणाले. ‘माझ्यावर कर्नाटकच्या जनतेचं ऋण आहे. जनतेचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही, हे मी आमदार आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. आपण प्रामाणिकपणे काम करायला हवं आणि स्वच्छ प्रशासन द्यायला हवं. अनेक अधिकारी प्रामाणिक आहेत. सर्वांनी तसं व्हायला हवं,’ अशी अपेक्षा त्यांनी राजीनाम्याची घोषणा करताना बोलून दाखवली.
मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की नाही, याचा निर्णय सोमवारी होईल असं येडियुरप्पा यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आपण पुढील १० ते १५ वर्षे भाजपसाठी काम करू असंदेखील त्यांनी सांगितलं होतं. ७८ वर्षांचे येडियुरप्पा लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. गेल्या २ दशकांपासून ते कर्नाटक भाजपचा चेहरा राहिले आहेत. मुख्यमंत्रिपदी कायम राहायचं की नाही याबद्दल नेतृत्त्वानं कोणताही संदेश दिला नसल्याचं येडियुरप्पांनी काल संध्याकाळी म्हटलं होतं.
* तीन अटी ठेवल्याची चर्चा
विशेष म्हणजे येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी भाजपचे सचिव सी. टी. रवी यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. ‘मुख्यमंत्रिपदी २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल येडियुरप्पांचं अभिनंदन. ते कर्नाटक आणि भाजपला मार्गदर्शन करत राहतील,’ असं रवी यांनी म्हटलं होतं. यानंतर पुढच्या काही मिनिटांत येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांनी पायउतार होण्याआधी पक्षासमोर ३ अटी ठेवल्याचं बोललं जातं. एका मुलाला केंद्रात, तर दुसऱ्याला राज्यात मंत्रिपद आणि पुढील मुख्यमंत्री आपल्याच मर्जीतील अशा तीन अटी येडियुरप्पांनी नेतृत्त्वासमोर ठेवल्या होत्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.