सोलापूर : आज मंगळवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. सदरची सभा ऑनलाईन न घेता ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापौर तसेच सभागृहनेते यांच्याकडे केली आहे. पक्षीय बलाबलानुसार 25 टक्के उपस्थितीत ऑफलाईन सभा घ्यावी, अशी मागणी केली. मात्र पालिका आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असून शासन निर्णयानुसार ऑनलाईन सभा घेता येणार नाही ऑफलाईनच सभा घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज मंगळवार सकाळी 11 वाजता ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. त्यावेळी सन 2020 – 21 मधील महापालिकेचे आणि परिवहनचे, शिक्षण मंडळाचे बजेट सादर केले जाणार आहे. ही बजेट सभा ही सर्व नगरसेवकांसाठी महत्त्वाची सभा आहे. त्या सभेमध्ये अनेक नगरसेवकांना प्रत्येक गोष्टीवर भाष्य करायचे असते.
त्यामुळे सदर ही सभा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे , काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव , आणि कामिनी आडम यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मागणी केली.
त्यानुसार महापौरांच्या दालनात महापौर श्रीकंचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ठामपणे सांगितले, शासन निर्देशानुसार सभा अॉफलाईन घेता येणार नाही या वेळी गटनेत्यांनी पक्षीय बलाबल यानुसार प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांला निमंत्रित करून 25 टक्के उपस्थिती ही सभा घ्यावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाला देखील अद्याप पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली नसून ऑनलाईन सभा घेण्यावर पालिका आयुक्त ठाम आहेत.
त्यामुळे अर्थसंकल्पीय बजेटवर संभ्रमाचे सावट आहे. जर ऑनलाईन पद्धतीने सभा घेऊन बजेट मारण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला तर सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक एकत्र येऊन गोंधळाची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेत अर्थसंकल्पाच्या सभेच्या वेळी पोलिस बंदोबस्त मागवण्याची तयारी देखील सत्ताधारी पक्षाच्या वतीने केली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीत आजची होणारी अर्थसंकल्प सभा गोंधळी वातावरणात होण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* परिवहनसाठी निधीची तरतूद करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
सोलापूर : महापौर यांच्या कार्यालयामध्ये सोमवारी परिवहन संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी वारंवार परिवहन सभापती, कामगार संघटना व ज्येष्ठ नगरसेवक यु.एन बेरिया यांनी महापौरांकडे परिवहन संदर्भात विविध अडचणी संदर्भात बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये होणार्या बजेट बोर्डमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांसाठी थकित असलेल्या पगारासाठी बजेटमध्ये तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर चर्चा करण्यात आले. त्यानुसार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आश्वासन देत मंगळवारच्या (आजच्या) बजेटमध्ये परिवहनसाठी बजेट तरतूद करण्यात येईल, अशी माहिती दिली. तसेच यावेळी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी परिवहन विभाग खाजगी करण्यासंदर्भात यावेळी माहिती दिली.
या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,परिवहन सभापती जय साळुंखे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, माजी विरोधी पक्ष नेते महेश अण्णा कोठे, ज्येष्ठ नगरसेवक यु एन बेरिया जेष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.