टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताने शानदार विजय मिळवला आहे. आज भारतीय हॉकी संघाने अर्जेंटीनाचा पराभव केला आहे. भारताने ३ गोल केले. तर अर्जेंटीनाला १ गोल करता आला. अ गटात भारताने ही कामगिरी केली आहे. याआधी स्पेनला भारताने पराभूत केले होते. तर ऑस्ट्रेलियाकडून भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला होता.
* ऑलिम्पिक गुडन्यूज – पी. व्ही. सिंधूचा विजय
ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजयाचा चढता क्रम ठेवला आहे. आज सिंधू डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला आहे. तसेच तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत पदकाची प्रमुख दावेदार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकले होते. यावेळी ती सुवर्ण जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्वी फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा ४० मिनिटांमध्ये २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे आता सिंधू पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी ५-१ अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकलेत.
सिंधूने या सामन्यामध्ये मियाच्या विरुद्ध खेळताना चांगली सुरवात केली. पहिल्या सेटमध्ये काही वेळ सिंधू ११-६ ने आघाडीवर होती. त्यानंतर स्कोअर १३-१० झाला. त्यानंतर १६-१२ असा स्कोअर झाला. मात्र मियाने दमदार कमबॅक केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सामना १६-१५ पर्यंत आला. मात्र नंतर सिंधूने सामन्यावरील पकड मजबूत करत लागोपाठ पाच पॉइण्ट जिंकत पहिला सेट २१-१५ च्या फरकाने आपल्या नावावर केला. पहिला सेटमध्ये २२ मिनिटांचा खेळ झाला.
दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने चांगली सुरुवात केली आणि ५-० ची आघाडी मिळवली. त्यानंतर मियाने चांगला खेळ करत स्कोअर ३-६ पर्यंत आणला. मात्र हाफ टाइमपर्यंत सिंधूने ११-६ च्या फरकाने आघाडी घेतली होती. शेवटी तिने २१-१३ च्या फरकाने दुसरा सेटही जिंकला. हा सेट १९ मिनिट चालला. आता सिंधू महिला बॅडमिंटनच्या एकेरी स्पर्धेत अंतिम ८ खेळाडूंमध्ये आहे.
* – बॅडमिंटन आणि हॉकीचे सामने सुरु
> बॅडमिंटन : PV सिंधुने पहिला सेट जिंकला PV सिंधुने पहिला सेट २१-१५ ने जिंकला आहे. सिंधु यामध्ये ड्रॉप शॉट्स आणि स्मॅथच्या बळावर पाँईट्स मिळवले. २२ मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये ती खूपच कंट्रोलमध्ये दिसली.
> हॉकी – पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम ०० आज हॉकीमध्ये भारताचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होत आहे. पहिल्या हाफचा खेळ संपला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे.