मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल 15 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाहवर 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिएलिटी शोमध्ये तो सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळताना खूप आनंद होत असल्याची भावना अंकुशने आहे.
कोरोनामुळे अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग ठप्प आहे. त्यानंतर चित्रीकरण पुन्हा सुरळीत सुरु झाल्यानंतर मराठी कला विश्वातही अनेक कलाकार पुन्हा छोट्या पडद्यावर पुररागमन करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्टार प्रवाहवर 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुश चौधारीवर असणार आहे.
अंकुश चौधरीने त्याच्या या शोचा प्रोमा सोशलमिडीयावर शेअर केला आहे. अंकुशला अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, सोनाली खरे अशा अनेकांनी अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशसोबतच अभिनेत्रा श्रेयस तळपदेने देखील छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केलंय. झी मराठीवर श्रेयस तळपदेची नवी मालिका सुरु होतेय. यासाठी अंकुशने श्रेयसला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
मी होणार सुपरस्टार या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. मी जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन.” असं अकुश यांनी म्हटलंय.