नातेपुते : लोणंद तालुका माळशिरस येथे बाळूमामाच्या कार्यक्रमात मराठी वेबसिरीजमधील नामांकित कलाकार बाळासाहेब उर्फ ह.भ.प.भरत शिंदे (रा. कांबळेश्वर, बारामती ) यांच्यासह ९ जणांवर नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधून करमणूक तर किर्तनातून समाज प्रबोधनाचे धडे देणारे ह भ प भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांनी कोरोना परीस्थितीचे गांभीर्य विसरुन गर्दी जमवण्यास कारणीभूत ठरावे याबाबद त्याचे चाहते व जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सध्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थिती असल्याने माळशिरस तालुक्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने बंदी घातली आहे. परंतु गुरुवारी (२९ जुलै ) लोणंद येथील खताळ वस्ती येथे तानाजी आबा खताळ यांच्या शेतात बाळुमामाचे मेंढर बसवलेली होती. त्या ठिकाणी मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधील कलाकार ह. भ. प. भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कीर्तनाचे आयोजन राजेंद्र दगडू रुपनवर, संदीप राजेंद्र रुपनवर, रघुनाथ हिंमत रुपनवर, बापूराव ब्रह्मचारी रुपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ व दादासो शंकर शेंडगे यांनी केले होते. त्या ठिकाणी सुमारे सातशे ते आठशे लोकांची गर्दी जमा झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर लोणंद गावचे तलाठी संजय गोरे यांनी नातेपुते पोलिसात याबाबत फिर्याद दिली.तलाठी संजय गोरे यांच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाण्यात या सर्वावर गुन्हा दाखल झाला.
तानाजी बाबा खताळ, राजेंद्र दगडू रुपनवर ,संदीप राजेंद्र रुपनवर ,रघुनाथ हिम्मत रुपनवर ,बापूराव ब्रम्हचारी रुपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ (सर्व रा. लोणंद) दादा शंकर शेंडगे (रा. कण्हेर), भरत शिंदे उर्फ बाळासाहेब राहणार (कांबळेश्वर, बारामती) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल हांगे, माने,जानकर , घाडगे या पथकाने ही कारवाई केली.
* पेंटरची गळफास घेवून आत्महत्या
बार्शी : शहरातील बारंगुळे प्लॉट मध्ये राहणार्या फरीद महंमद शेख (वय 32) या पेंटरने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत मयताचे वडिल महंमद नानूमियॉं शेख यांनी शहर पोलिस ठाण्यास खबर दिली आहे.
फरीद शेख हे आपल्या वडिलांसमवेत पेंटरचा व्यवसाय करत होते. बारंगुळे प्लॉट मध्ये तावडे पिठाच्या गिरणीजवळ त्यांचे घर होते. ते आई-वडिलांसमवेत राहत होते. काल शनिवारी रात्रौ नेहमीप्रमाणे सर्वजण जेवण उरकून झोपले. सकाळी सहाच्या सुमारास महंमद शेख हे पाणी भरण्यासाठी उठले. त्यांनी सून हिना हिस उठविले असता फरीद दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी आसपास शोध घेतला. जुन्या घराकडे ते गेले असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पत्रा उचकटून पाहिले असता किचनमध्ये लोखंडी पाईपला फरीद याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.