मुंबई : मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली. 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. तसेच धार्मिस्थळं व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून होणार आहे. राज्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत राजेश टोपे यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार अशी घोषणा सरकारने केली होती. परंतू या निर्णयाला राज्य सरकारने 24 तासांत ब्रेक दिला. टास्क फोर्स आणि पिडियाट्रिक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात आता निर्बंधांबाबत शिथिलता देण्याचा महत्वापूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू असणार आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनच्या वर पोहोचेल तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
* दोन डोस घेतलेल्यांना परवानगी
राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवागनी देण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर 200 माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा 100 माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय देखील 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे, असं टोपे यांनी सागितलं आहे.