मुंबई : एकदा दारू प्यायली की बहुतेकांना त्याची चटक लागते. मात्र हीच चटक मनुष्य प्राण्यालाच नाही तर पाळीव प्राण्यालाही लागते. हो खरंय. फक्त माणसंच नाही तर कोंबड्यालाही दारूची अशीच चटक लागली आहे. दारू पिणाऱ्या कोंबड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. जो पाहून आपणही हैराण व्हाल.
दारू ही अशी आहे की एकदा कुणी त्याच्या आहारी गेलं की सुटता सुटणं मुश्किल आहे. एका व्यक्तीने चक्क कोंबड्यालाही दारू पाजली आणि मग काय कोंबड्यालाही दारूशिवाय दुसरं काहीच नकोसं झालं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याला अशी चटक लागली की त्याला दुसरे काहीच नको म्हणत आहे. असा हा कोंबडा. याची सर्व ठिकाणी चर्चा होत आहे.
व्हिडीओत पाहू शकता, या व्यक्तीने कोंबड्याला आपल्या मांडीवर घेतलं आहे. सुरुवातीला या कोंबड्याला एका ग्लासमधून दारू दिली जाते. कोंबडा ग्लासात आपली चोच टाकून दारू पितो. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या मांडीवर हा कोंबडा बसला आहे, त्याच्या हातात पाण्याचा ग्लास आहे. ती व्यक्ती कोंबड्याजवळ पाण्याचा ग्लास नेते. कोंबडा आपलं तोंड त्या ग्लासाजवळ नेतो. पण तो लगेच मागे घेतो. कदाचित त्याला त्या ग्लासातून दारूसारखा वास येत नाही, त्यामुळे तो ते पित नसावा, असेच वाटते.
पुन्हा या कोंबड्यासमोर दारूचा ग्लास आणला जातो. तो त्या ग्लासमध्ये आपलं डोकं टाकून चोचीने घटाघट दारू पितो. मग पाण्याचा ग्लास दिसताच तो सरळ सरळ तोंडच फिरवतो. त्या पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहत नाही. असं एकदा दोनदा नाही किती तरी वेळा पाहायला मिळतं. सध्या हा खूप व्हायरल होत आहे.