नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यसभेत पहिल्यांदा बाहेरच्या लोकांना बोलावून आणि त्यांना निळी वर्दी घालून खासदारांना मारहाण करण्यात आली आहे, हे पहिल्यांदाच घडले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान राज्यसभेत बुधवारी मोठा गोंधळ झाला होता. यावेळी मार्शलला बोलावण्यात आले.
संपूर्ण पावसाळी अधिवेशनात संसदेत केंद्रावर कारभारावर राहूल गांधींनी शाब्दीक हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेल्याचे म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विजय चौक येथे आल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.”आम्ही पेगॅससचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावं लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे,” असा राहुल गांधींनी आरोप केला. संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे, ”असे राहुल गांधी म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी झाले होते. “बाहेरून लोकांना संसदेत आणण्यात आले ज्यांनी मार्शल कपडे घातले आणि महिला खासदारांवर हल्ला केला. ही लोकशाहीची दररोज हत्या आहे,” असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं. असे वाटले की मी संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभा आहे, अशी खंत व्यक्त केली.
* विजय चौकापर्यंत विरोधी पक्षाने काढला संयुक्त मोर्चा
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आज गुरुवारी विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या दरम्यान राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केले आणि सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल भाष्य केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांना मारहाण करण्यात आली.