नाशिक : नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. उद्या 15 ऑगस्टपासून नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना आता हेल्मेट घालूनच प्रवास करावा लागणार आहे. तसेच सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे हेल्मेट घातले तरच पेट्रोल मिळणार आहे.
नाशकात पुन्हा हेल्मेटसक्ती लागू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर हेल्मेट परिधान केलं नसेल तर दुचाकी स्वाराला पेट्रोल मिळणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून नाशिक शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल ही मोहीम हेल्मेटसक्तीसाठी राबवली जाणार आहे. दरम्यान, हेल्मेटसक्तीबाबत नाशिककर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला दुचाकीस्वार कसे प्रतिसाद देणार, हे उद्या दिसणार आहे.