सोलापूर : राज्य सरकारने उद्या रविवार, 15 ऑगस्टपासून राज्यातील सर्व दुकाने व्यापार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची उद्यापासून अंमलबजावणी राज्यात होणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यात परिस्थितीप्रमाणे त्या – त्या जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी आज निर्णय घेतला आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा, पंढरपूर, करमाळा, सांगोला, माळशिरस या पाच तालुक्यात संचारबंदी कायम ठेवली आहे. मात्र इतर सहा तालुक्यांमधील निर्बंध उठवले आहेत. त्या ठिकाणी सर्व दुकाने उपहारगृह हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , माढा , माळशिरस , करमाळा , सांगोला हे तालुके वगळून अन्य तालुक्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
इतर सहा तालुक्यांमध्ये निर्बंध उठवण्यात आले असून सर्व दुकाने उपहारगृह हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. यात अक्कलकोट , बार्शी , उत्तर सोलापूर , दक्षिण सोलापूर , मंगळवेढा , मोहोळ या तालुक्यांचा समावेश आहे. सोलापूर शहरात ही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. याबाबत आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.