नवी दिल्ली : भारताचा आज 75 वा स्वातंत्र्य दिन. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मोदी देशवासियांना संबोधित केले. भाषणाच्या सुरूवातीला मोदींनी महात्मा गांधींपासून नेहरूंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल, असं नरेंद्र मोदी आवर्जून सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह झाला. त्यामुळे कार्यक्रम मोजक्याची उपस्थिती होती. तब्बल 1 तास 38 मिनिटे नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं. तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. भारतीय रेल्वे नव्या रुपात समोर येत आहे. गतीने आधुनिक रुप घेत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 आठवड्यात 75 ‘वंदे भारत’ रेल्वे देशाच्या प्रत्येक भागाला जोडतील, असं मोदी म्हणाले. तसेच देशात हवाई सेवा वाढत आहेत. अनेक भागात विमानसेवा पोहोचत आहे. कनेक्टिविटी वाढत आहे, असंही ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताची विकास यात्रा सुरू करण्याची वेळ आली आहे. या विकास यात्रेची आता सुरुवात करून, पुढील 25 वर्षांचा प्रवास हा नवीन भारताच्या निर्मितीचा अमृत काळ आहे. या अमृत काळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्याच्या शंभर वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सर्व सैनिका शाळांची दरवाजे आता मुलींसाठीही उघण्यात येतील. देशात सध्या 33 सैनिकी शाळा आहेत. अडीच वर्षांपूर्वी मिझोराममध्ये मुलींना सैनिका शाळेत प्रवेश देण्याचा प्रयोग केला गेला. आता देशातील सर्व सैनिकी शाळांची दरवाजे मुलांसाठी खुली केली जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करण्यात येईल. 100 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन हा औद्योगिक उलाढालीला चालना देणं आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणारा असणार असल्याचे सांगितले.
सरकार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना वितरित करण्यात येणारा तांदूळ पौष्टिक केला जाईल. सरकार आपल्या विविध योजनांतर्गत जे तांदूळ गरीबांना देते, ते आता पौष्टिक तांदूळ देईल. रेशन दुकानातून दिला जाणारा तांदूळ असो की मध्यान्ह भोजणासाठी दिला जाणारा तांदूळ, 2024 पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक केला जाणार असल्याचे सांगितले.