मुंबई : अभिनेता मिलिंद सोमण हा अजूनही तंदुरुस्त आहे. सध्या दररोज व्यायाम करण्यासाठी तरुणांना प्रेरित करणारा मिलिंद आता एक नवा विक्रम करण्याची तयारी करत आहे. तो मुंबई ते गुजरात अनवाणी प्रवास करणार आहे. आज 15 ऑगस्ट रोजी मुंबईहून निघून 22 ऑगस्ट रोजी सरदार सरोवर डॅम, केवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचण्याचे त्याने ठरवलं आहे.
मिलिंद हा वयाच्या 55 व्या वर्षी देखील फिट अँड फाईन आहे. तरुणाला लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. सरदार सरोवर डॅम, केवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचण्याचे त्याने ठरविलं आहे. हे 420 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. 8 दिवसात वाटेत लागणाऱ्या शाळा, रुग्णालये, गावं यांना भेट देणार आहे. तीत एकता, शांतता आणि आरोग्य यांचा संदेश देणार आहे. हा संदेश सर्वांसमोर पोहचवणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिलिंदनं काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील काही राज्यांचा दौरा केला होता. त्यात त्यानं अनेक गावांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती जाणून घेऊन चाहत्यांशी संवादही साधला होता.
* पुशअप्स कसे मारायचे?
मिलिंद पुशअप्स चॅलेंजमुळे चर्चेत होता. मिलिंदची ही फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो पुशअप्स कसे मारायचे? आणि कसे मारायचे नाहीत? याबद्दल मार्गदर्शन केलं होतं. शिवाय व्हिडीओच्या शेवटी त्यानं एक मिनिटांत 40 पुशअप्स मारुन दाखवले. खरं तर पुशअप्स हा अत्यंत कठीण प्रकार आहे. यामध्ये केवळ हाताच्या आधारावर संपूर्ण शरीराचं वजन उचलावं लागतं. हा व्यायाम करताना शरीराचं संतुलन असणं आवश्यक आहे. अन्यथा हात किंवा पाठ लचकू शकते. परंतु मिलिंद दररोज न चूकता हा व्यायाम करतो त्यामुळं आता तो अगदी तंदुरुस्त झाला आहे.