नवी दिल्ली : देशातील विविध भागात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी केले जातात. भोपाळच्या गिन्नौरी संकट हारण महादेव मंदिरात पिंडीला नोटांनी सजवण्यात आले आहे. नोटा एकत्रित करुन जबरदस्त श्रृंगार करण्यात आला आहे.
राठौर संघाच्या कमिटीने या नोटा लोकांकडून गोळा केल्या आहेत. यामध्ये 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. महादेवाच्या सजावटीसाठी भक्तांनी तब्बल 15 लाख रुपयाच्या नोटा अर्पण केल्या आहेत. फोटो राजधानी भोपाळच्या गिन्नौरी संकट हारण महादेव मंदिरातील आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राठौर संघाचे अध्यक्ष मुकेश राठौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 लोकांनी मिळून इतकी मोठी रक्कम जमा केली आहे. कोणी 25 हजार, कोणी 35 हजार तर कोणी 50 हजार रुपये देऊन रक्कम जमा केली.
महादेवाच्या अनोख्या सजावटीसाठी 4 ते 5 तासांचा कालवधी लागला. तसंच महादेवाला अर्पण करण्यात आलेली ही 15 लाखांची रक्कम समाज कार्यासाठी खर्च केली जाईल, असंही सांगण्यात येतंय.