वाशिम : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. सोमय्या यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली. सोमय्या आज वाशिम दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. शिवसेनेच्या गुंडांनी माझ्या कारवर हल्ला केला. माझ्या कारवर 3 मोठे दगड कले. जेथे मी बसतो तिथे खिडकीवर हा हल्ला झाला, असं त्यांनी ट्विट करून सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून सांगितले की, दुपारी 12.30 मिनिटांनी कार वाशिम मधून जात होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर तीन मोठे दगड फेकले. जे खिडकीच्या काचाला लागले. यावेळी गाडीत मी आमदार राजेंद्र पटानी, तेजराव थोराट आणि सीआयएसएफचे जवान होते.
किरीट सोमय्या यांनी आरोप लावला की, शिवसेनेच्या लोकांना माहित होते की माझ्या गाडीचा ताफा येथून जाणार आहे. त्यामुळे ते लोक आधीच रस्त्यावर उभे होते. त्यांनी कार वर शाई आणि दगड फेकले. दरम्यान पोलिसांनी हलक्या स्वरूपात बळाचा वापर करीत शिवसैनिकांना तेथून पळवून लावले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किरीट सोमय्या हे सतत सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर आणि मत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. वाशिम दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या आज बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्यासाठी येत होते. मात्र, खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.
किरीट सोमैया यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला. त्याची माहिती घेण्यास ते वाशिम जिल्ह्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्या कारवर हल्ला झाला.